Tuesday, 2 July 2013

नक्षलवादाचे आव्हान : पुस्तकाविषयीची नोंद

साधना प्रकाशन
'लोकसत्ते'चे चंद्रपूरमधील प्रतिनिधी देवेंद्र गावंडे यांच्या 'नक्षलवादाचे आव्हान : दंडकारण्यातील अस्वस्थ वर्तमान' या पुस्तकाबद्दलची ही नोंद आहे. 'साधना' प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ह्या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य हे की, लाखो प्रतींचा खप असलेल्या एका वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या पत्रकाराने वृत्तपत्राच्या तुलनेत खूपच कमी प्रतींचा खप असलेल्या साप्ताहिकासाठी लिहिलेल्या लेखांचं हे पुस्तक आहे. म्हणजे मुख्य प्रवाहात काम करत असूनही संबंधित पत्रकाराचं पुस्तक रूपातलं ठोस प्रकारातलं काम झालं ते तुलनेने लहान स्वरूपातल्या छापील माध्यमात. हे सकारात्मक वैशिष्ट्य 'साधना' साप्ताहिकाचंही कौतुक करण्याजोगं आहे.

अलीकडेच 'रेघे'वरच्या एका नोंदीत या पुस्तकाचा उल्लेख आला. त्यात 'या पुस्तकामध्ये जे येतं ते साधारपणे वृत्तपत्रांमधल्या बातम्यांमधून जे येतं ते. या माहितीत साधारणपणे 'आव्हान' म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते वरकरणी दिसतं तेच. म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणावर तो वरकरणी भागच येतो, असं वाटतं' - असं आपण म्हटलं होतं. या नोंदीवरून एक-दोन वाचकांनी विचारलं की, ह्या पुस्तकात दोन्ही बाजू मांडल्यात, मग त्यावर असं का नकारात्मक लिहायचं?

गावंडे यांच्या पुस्तकाबद्दल नकारात्मक लिहिणं हा आपल्या जुन्या नोंदीचा हेतू नसून त्यांच्या लिखाणासंबंधी आणि एकूण ह्या विषयासंबंधी प्रश्न उपस्थित करणं हा आपला मुख्य हेतू आहे. तो तसा का आहे, हे स्पष्ट करण्यासाठी गावंडे यांच्या पुस्तकाला सुहास पळशीकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेकडे जाऊया. या प्रस्तावनेत पळशीकर एके ठिकाणी म्हणतात :
एका अर्थाने हे पुस्तक केवळ नक्षलवादाच्या चर्चेच्या पलीकडे जाते. नक्षलवादाचा मुद्दा फक्त कायदा-सुव्यवस्थेचा नाही. तो फक्त भ्रष्टाचार आणि वाईट शासन व्यवहाराचा प्रश्न नाही. इतकेच नव्हे, तर भांडवली विकासातील विपर्यासांपुरताही तो प्रश्न मर्यादित नाही. सशस्त्र लढ्याची व्यूहरचना आणि क्रांतीची भाषा यांच्यामुळे नक्षलवादाचा मुद्दा हा लोकशाहीच्या प्रश्नाला जाऊन भिडतो. गावंडे यांनी ते पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत अचूकपणे सूचित केले आहे. ('नक्षलवादग्रस्त भागात लोकशाही रुजवण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकाला' गावंडे यांनी हे पुस्तक अर्पण केलंय - रेघ) मात्र प्रत्यक्ष पुस्तकात एखाद्या लेखाचा अपवाद सोडला तर ही चर्चा फारशी येत नाही. (कदाचित विषयाची मर्यादा सांभाळून निवेदनाचा टोकदारपणा वाचकांपर्यंत पोचवण्याच्या हेतूने हे झाले असेल.)

लोकशाहीविषयी दोन टोकाची आकलने असलेली आपल्याला दिसून येतात. त्यांतले एक नक्षलवाद्यांचे आहे. नक्षलवाद्यांच्या दृष्टीने लोकशाहीची दोन रूपे असतात : एक प्रचलित भांडवलशाही लोकशाही. ही त्यांच्या दृष्टीने बेगडी असते. तिच्या कार्यपद्धतींवर आणि प्रक्रियांवर त्यांचा विश्वास नसतो. सोयीचे असेल तेव्हा बूर्ज्वा लोकशाहीतील अधिकार आणि 'कायद्याच्या राज्या'चे कवच वापरून राज्यसंस्थेच्या दंडशक्तीपासून स्वतःचा बचाव करण्यापुरता ते प्रचलित लोकशाहीचा 'वापर' करून घेतात. पण त्यांचा प्रचलित लोकशाहीवर - तिच्यातील श्रेयसांच्या शक्यतेवर - अजिबात विश्वास नसतो. दुसरे रूप क्रांतीनंतर येणाऱ्या लोकशाहीचे. पण इथे त्याची चर्चा अनावश्यक आहे.

दुसरीकडे लोकशाही म्हणजे फक्त स्पर्धात्मक राजकारण आणि काही औपचारिक कार्यपद्धती एवढेच मानून प्रचलित लोकशाहीची भलामण केली जाते. 'संविधान दिले, अधिकार दिले, निवडणुका होतात, आता आणखी काय पाहिजे?' असा अविर्भाव असतो. आजची सरकारे जे-जे धोरणात्मक निर्णय घेतात ते या 'लोकशाही' मार्गाने झाल्यामुळे त्यांच्यात आपोआप 'सार्वजनिक हिता'चा घटक समाविष्ट असतोच, असे मानून सर्व धोरणांचे समर्थन केले जाऊ शकते.

या दोन टोकांच्या आकलनांच्या पलीकडे जाऊन लोकशाही नावाचा गुंता समजून घ्यायला हवा. लोकशाही टाकाऊ मानण्याच्या नक्षलवादी भूमिकेमुळे तो गुंता समजू शकत नाही आणि फक्त स्पर्धात्मक राजकारणाला लोकशाही मानल्यामुळेही तो गुंता सुटत नाही. म्हणूनच 'सलवा जुडूम' हे काही नक्षलवादावरचे लोकशाही स्वरूपाचे उत्तर ठरू शकत नाही. यातच आपण लोकशाहीच्या गुंत्याला हात घालतो : सशस्त्र लढा करून उदात्त लोकशाही येणे दुरापास्त आहे; शोषणाविरुद्ध सशस्त्र लढा करणाऱ्यांना फक्त दंडशक्तीने मोडून काढणे लोकशाहीत अभिप्रेत नाही; सशस्त्र क्रांतिकारकांच्या विरोधात सामान्य जनतेला शस्त्रे देऊन हिंसा वाढवणे लोकशाहीत बसत नाही; सशस्त्र समूहांमुळे राज्यसंस्थेच्या हिंसेचा वापर वाढून ती अमानुष बनते; पण सशस्त्र समूहांचे अस्तित्व असताना राज्यसंस्था त्यांच्याकडे दुर्लक्षही करू शकत नाही. 'नक्षलवादाचे आव्हान' हे या अर्थाने जिकीरीचे, गुंतागुंतीचे आणि लोकशाही व्यवहारांविषयीचे आव्हान आहे. ह्या सर्व गुंत्याची चर्चा ह्या पुस्तकात नाही. या सर्व गुंतागुंतीवर उत्तरे सुचविण्याचा आविर्भावही या पुस्तकात नाही. पण या पुस्तकातील लेखन काळजीपूर्वक वाचले तर वाचकांच्या मनात हे प्रश्न उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. हेच या लेखनाचे महत्त्वाचे यश आहे.

पळशीकर ज्या गुंतागुंतीबद्दल बोलतायंत, त्या गुंतागुंतीवर सततची प्रक्रिया म्हणून शांततेतही चर्चा व्हायला हवी, अन्यथा केवळ सुट्या घटना पाहून नक्षलवादाचा प्रश्न तपासता येणार नाही, असं वाटतं. आणि त्यासंदर्भातच गावंडे यांच्या पुस्तकाबद्दलचं निरीक्षण आपण नोंदवलं होतं. पण त्या निरीक्षणामुळे या पुस्तकाकडे दुर्लक्ष केल्यासारखं होऊ नये, म्हणून आपण ही स्वतंत्र नोंद पुस्तकाबद्दल करतो आहोत. 

'रेघे'वर आपण यासंबंधी जे प्रश्न आत्तापर्यंत नोंदवलेत, ते गावंडे यांनाही विचारले आणि ते त्याबद्दल तपशिलात वेळ देऊन बोललेही. आणि पळशीकर म्हणतात त्याप्रमाणे वाचकांच्या मनात असे प्रश्न उपस्थित होण्यासाठी आवश्यक माहिती गावंडे यांच्या पुस्तकातून मिळते हेच या पुस्तकाचं यश आहे. गावंडे नियमितपणे गेली कित्येक वर्षं ह्या विषयाच्या मागावर आहेत. त्यात त्यांच्या मतांमध्ये, माहितीमध्ये, विचारांमध्ये बदल होत गेले. त्यानुसार त्यांच्या वार्तांकनामध्येही बदल झाले. आणि हे स्पष्टपणे वाचकांना सांगण्याचा प्रामाणिकपणा त्यांनी ह्या पुस्तकातल्या 'नक्षलवादग्रस्त भागात माझी पत्रकारिता' ह्या प्रकरणात दाखवलेला आहे. त्याआधीच्या सव्वीस प्रकरणांमध्ये विविध घटना, व्यक्ती यांच्या उदाहरणांमधून नक्षलवादाच्या समस्येचं चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे. ही माहिती 'फर्स्ट-हँड' आहे आणि त्यातून वाचक या समस्येच्या सध्याच्या रूपाबद्दल जाणून घेऊ शकतात.

नक्षलवादी सत्तेच्या खेळासाठी आदिवासींचा वापर कसा करतायंत आणि प्रस्थापित सरकार त्यासंबंधी काय करतंय, हा या समस्येचा एक भाग आहे, असं या पुस्तकातून लेखक सांगतात. सध्या ही समस्या आदिवासी भागामध्ये सशस्त्र रूपामध्ये आहे आणि त्या भागाबद्दलची माहिती मिळवण्यासाठी हे पुस्तक उपयोगी ठरणारं आहे. त्यानंतर मात्र वाचकांची जबाबदारी सुरू होते आणि त्यातून प्रश्न उपस्थित झाले तर ते लोकशाहीपणाचंच लक्षण असावं. अन्यथा एकतर्फीच माहितीचा प्रवाह सुरू राहण्याची शक्यता आहे.

1 comment:

 1. I quote a slightly longish quote on how revolution erupts from one of the greatest books I have come across: "From Dawn to Decadence/ 1500 to the present" by Jacques Barzun.

  Read it and then map Naxalism and Naxalites on these words and see the result.

  “How a revolution erupts from a commonplace event—tidal wave from a
  ripple—is cause for endless astonishment. Neither Luther in 1517 nor the
  men who gathered at Versailles in 1789 intended at first what they produced
  at last. Even less did the Russian Liberals who made the revolution of 1917
  foresee what followed. All were as ignorant as everybody else of how much
  was about to be destroyed. Nor could they guess what feverish feelings, what
  strange behavior ensue when revolution, great or short-lived, is in the air.
  First, a piece of news about something said or done travels quickly, more
  so than usual, because it is uniquely apt; it fits a half-conscious mood or caps
  a situation: a monk questions indulgences, and he does it not just out of the
  blue—they are being sold again on a large scale. The fact and the challenger's
  name generate rumor, exaggeration, misunderstanding, falsehood. People
  ask each other what is true and what it means. The atmosphere becomes electric,
  the sense of time changes, grows rapid; a vague future seems nearer.
  On impulse, perhaps to snap the tension, somebody shouts in church,
  throws a stone through a window, which provokes a fight—it happened so at
  Wittenberg—and clearly it is no ordinary breach of the peace. Another
  unknown harangues a crowd, urging it to stay calm—or not to stand there
  gaping but do something. As further news spreads, various types of people
  become aroused for or against the thing now upsetting everybody's daily life.
  But what is that thing? Concretely: ardent youths full of hope as they catch
  the drift of the idea, rowdies looking for fun, and characters with a grudge.
  Cranks and tolerated lunatics come out of houses, criminals out of hideouts,
  and all assert themselves.
  Manners are flouted and customs broken. Foul language and direct insult
  become normal, in keeping with the rest of the excitement, buildings defaced,
  images destroyed, shops looted. Printed sheets pass from hand to hand and are
  read with delight or outrage—Listen to this! Angry debates multiply about
  things long since settled: talk of free love, of priests marrying and monks breaking
  their vows, of property and wives in common, of sweeping out all evils, all
  corruption, all at once—all things new for a blissful life on earth.
  A curious leveling takes place: the common people learn words and ideas hitherto not familiar and not interesting and discuss them like intellectuals, while others neglect their usual concerns—art, philosophy, scholarship—because there is only one compelling
  topic, the revolutionary Idea. The wellto-do and the "right-thinking," full of
  fear, come together to defend their possessions and habits. But counsels
  are divided and many see their young "taking the wrong side." The powers
  that be wonder and keep watch, with fleeting thoughts of advantage to be had
  from the confusion. Leaders of opinion try to put together some of the ideas
  afloat into a position which they mean to fight for. They will reassure others,
  or preach boldness, and anyhow head the movement.
  Voices grow shrill, parties form and adopt names or are tagged with
  them in derision and contempt. Again and again comes the shock of broken
  friendships, broken families. As time goes on, "betraying the cause" is an
  incessant charge, and there are indeed turncoats. Authorities are bewildered,
  heads of institutions try threats and concessions by turns, hoping the surge of
  subversion will collapse like previous ones. But none of this holds back that
  transfer of power and property which is the mark of revolution and which in
  the end establishes the Idea.”

  ReplyDelete