भोसले यांचा लेख वाचण्यासाठी या फोटोवर क्लिक करावं. |
तर, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या वाटेत ही शाळा आल्यामुळे आता ती जमीनदोस्त करण्यात आली आहे. "महाराष्ट्र शासनानं समृद्धी महामार्गाची घोषणा केली. प्रकल्प सर्वांनी डोक्यावर उचलून घेतला. पण आमच्या मात्र तो मुळावरच उठला. कारण नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ‘प्रश्नचिन्ह’ शाळेला चिरतच गेला. एका देशाचे दोन तुकडे करावे तसे झाले. लिखापढी केली. आंदोलने केली. पण पाषाणाला घाम थोडाच फुटणार आहे! ‘प्रश्नचिन्ह’च्या प्रगतीवर बुलडोझर फिरले. होत्याचे नव्हते झाले. ज्ञानाची गंगा फासेपारधी समाजात आणणाऱ्या ‘प्रश्नचिन्ह’चे ग्रंथालय उद्ध्वस्त करण्यात आले. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बुजविण्यात आल्या. वर्गखोल्यांवरून बुलडोझर-जेसीबी -पोकलँड फिरले. फासेपारध्यांच्या आयुष्याचे वासेच फिरले. पिण्यासाठी पाणीही उरलं नाही. अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री सारे आश्वासन देत राहिले. पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. (...) ‘प्रश्नचिन्ह’मध्ये ४३६ विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. यांना एकत्र आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली आहे. हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. पोलिस स्टेशनच्या, कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या आहेत. (...) पण समृद्धी महामार्ग ‘प्रश्नचिन्ह’ शाळेवरून जात असल्यामुळे समृद्धी महामार्गाच्या वाटेत येणारी ही शाळा कडेलोट करण्यात आली. समृद्धी महामार्गाचा रोलर या शाळेच्या स्वप्नावरून फिरला आणि पार चुराडा करून गेला. समृद्धी महामार्गाचे यंत्र-मशिनरी ‘प्रश्नचिन्ह’ला ‘नामोनिशान’ करायला लागल्या. त्यांनी आमच्या स्वप्नाचा पार चुराडा करून टाकला होता," असं भोसले लिहितात. या संदर्भात थोडक्यात परिस्थिती मांडून भोसले यांनी मदतीचं आवाहन केलं आहे.
०००
'बजाज पल्सर' या प्रसिद्ध बाइकची 'डॅगर एज' ही नवीन आवृत्ती नुकतीच बाजारात आलेय. 'डॅगर' म्हणजे खंजीर, कट्यार, असं हत्यार. 'एज' म्हणजे 'धार'. तर, हत्यारासारखी धार असणारी ही बाइक. आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारं वाहन कट्यारीसारखं धारदार कशासाठी हवं? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी जाहिरातीत दिलेलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वृत्तपत्रांमधून आणि विविध ठिकाणी दिसत राहिलेली 'बजाज पल्सर- डॅगर एज' बाइकची जाहिरात अशी-
'कार्व्ह अप'चा सरळ अर्थ 'कापून तुकडे करणं' असा होतो. म्हणजे बजाज पल्सरची 'धारदार कट्यार वापरून रस्त्यांचे तुकडे करा'. इंग्रजीत लिहिलं की अर्थ सौम्य होतो? की, मराठीतही अर्थ पुरेसा हिंसक वाटत नाही?
प्रश्नचिन्ह आश्रमशाळेचा परिसर अमरावती जिल्ह्यात आहे. अमरावती शहरातली या बाइकची अंदाजे किंमत बजाज पल्सरच्या वेबसाइटवर सापडते ती अशी:
नोंदीच्या पहिल्या भागात येणारं वाक्य: 'नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ‘प्रश्नचिन्ह’ शाळेला चिरतच गेला. एका देशाचे दोन तुकडे करावे तसे झाले.'
नोंदीच्या दुसऱ्या भागात येणारा अर्थ: 'आमची बाइक वापरून रस्ते चिरत जा, रस्त्यांचे तुकडे करत जा.'
शीर्षक खूप च समर्पक दिल आहे ... अशा कित्येक प्रोजेक्ट्स ना असे किती मतीन भोसले न त्यांची स्वप्ने बळी पडले असतील काय माहित ... या मध्ये नुकसान कोणाचं हा चिंतन करायला लावणारा विषय आहे ...
ReplyDeleteरेघेचे आणखी एक धारदार टिपण. बघुया ते जाणीवा चिरत जाते का तर.
ReplyDelete