Monday, 18 March 2013

फेसबुक : तीन संदर्भ

मौज प्रकाशन । किंमत - ७५ रुपये
आम्ही चेहरा हा चेहरा ठेवत नाही. त्याचा मुखवटा बनवतो. लोकांच्या प्रेरणांप्रमाणे चलाख होऊन तो घडवतो आणि मग तो चढवूनच वावरतो. तो मग इतका घट्ट बसतो की खरा चेहरा कधी दिसतच नाही. आरशातसुद्धा. फोटोतसुद्धा. तो मुखवट्याच्या थडग्याखाली गाडला जातो. एखाद्याच भाग्यवानाला हे थडगे फोडून आपला चेहरा फिरून वर काढणे जमते.

- दुर्गा भागवत (दुपानी, पान २८)
***



OR books
जेकब : आपण जेव्हा रस्ता बांधतो तेव्हा त्यातल्या इंच न् इंचावर पाळत ठेवलेली असावी आणि ते केवळ काही गुप्त गटातल्या लोकांनाच पाहता यावं ही काही गरजेची गोष्ट नसते. पण अशा प्रकारे 'रस्तेबांधणी' इंटरनेटवर होतेय आणि ते रस्ते वापरण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं जातंय. आणि हे रस्ते बांधणाऱ्यांच्याच ताब्यात त्याची सत्ता राहील असं काही नाहीये हे लोकांना समजावणं आवश्यक आहे.

अँडी : आणि काही लोक तर फक्त रस्तेच बांधतात असं नाही. तर ते तिथे चांगली बागबिग उभी करतात आणि बाकीच्यांना तिथे येऊन नागडं होण्याचं निमंत्रण देतात. हे आता म्हणजे आपण 'फेसबुक'च्या विषयाकडे आलो! लोकांना सुखासुखी आपली माहिती उघड्यावर टाकण्यासाठी कसं प्रवृत्त करावं याचं हे उत्तम धंदेवाईक उदाहरण आहे.

(सायफरपंक्स, पान २५)

('विकिलिक्स'चा संस्थापक ज्युलियन असांज व जेकब अप्लबम, अँडी मुलर-मॅगन, जेरेमी झिमरमन या त्याच्या मित्रमंडळींमधील गप्पांच्या स्वरूपातलं हे पुस्तक आहे. मुख्यत्त्वे इंटरनेटवरती ठराविक कंपन्यांची 'मालकी' असल्यामुळे काय होऊ शकतं, त्यावर उपाय काय, आदी गोष्टींबद्दलच्या या गप्पा आहेत.)
***



स्मायली : बँक्सी.

***

1 comment: