Friday, 28 December 2012

रस्त्याकडची खिडकी

- फ्रान्झ काफ्का 

(मला जर्मन अजिबातच येत नाही, इंग्रजी पण जनरलच नि मराठी पण सामान्यच. तरी काफ्काची दोन वाक्यांची मूळ जर्मन गोष्ट इंग्रजीत वाचून ती मराठीत करून 'रेघे'वर नोंदवतोय, काफ्काची खरोखरचीच माफी मागून. एवढं लांबून केलेलं भाषांतर ही सगळीच एकूण वादग्रस्त घडामोड आहे. मूळ जर्मन वाक्यं, ती इंग्रजीत किती उतरली, ते मला किती समजलं, त्यातून मराठीत किती उतरलं, त्यात मी माझा शहाणपणा किती केला - या सगळ्या गोष्टींसकट ही नोंद.)


एकाकी आयुष्य जगणाऱ्या त्या माणसाला, क्वचित स्वतःचा कशाशी तरी संपर्क यावा असं वाटलं तर; दिवसातल्या वेळेच्या बदलानुसार, वातावरणातल्या बदलानुसार, कामाचा उरक असेल त्यानुसार, त्याला कोणाचा हात हातात घ्यावा असं वाटलं तर - रस्त्याकडे पाहणारी खिडकी नसेल तर त्याला हे शक्यच होणार नाही. आणि त्याला काहीच नकोय अशी स्थिती असेल नि तो थकलेल्या अवस्थेत खिडकीपाशी गेला, लोकांकडची नजर उचलून आकाशात पाहिलं नि परतला, बाहेर पाहायची इच्छा नाही म्हणून त्यानं डोकं थोडं वर उचललं, तरीसुद्धा रस्त्यावरचे घोडे त्याला ओढू पाहतील गाडीच्या डब्यांच्या आणि कोलाहलाच्या साखळीकडे आणि अखेर मानवी संगतीकडे.

फोटो : रेघ




***

आजचं वर्तमानपत्र वाचता वाचता आपण काफ्का वाचतो आहोत असं जोपर्यंत वाटू शकतं, तोपर्यंत काफ्का ताजाच राहणार : विलास सारंग

मूळ पुस्तक : सिसिफस आणि बेलाक्वा - विलास सारंग.
प्रास प्रकाशन - या लिंकवर गेल्यानंतर एकदम तळात पुस्तकाचं मुखपृष्ठ व प्रसिद्धीचा तपशील सापडेल.
***

काफ्का

3 comments:

  1. The English version of the hopeless Marathi translation in the above post :

    The Street Window
    by Franz Kafka
    Translated by Willa and Edwin Muir

    Whoever leads a solitary life and yet now and then wants to attach himself somewhere, whoever, according to changes in the time of day, the weather, the state of his business, and the like, suddenly wishes to see any arm at all to which he might cling - he will not be able to manage for long without a window looking on to the street. And if he is in the mood of not desiring anything and only goes to his window sill a tired man, with eyes turning from his public to heaven and back again, not wanting to look out and having thrown his head up a little, even then the horses below will draw him down into their train of wagons and tumult, and so at last into the human harmony.

    ReplyDelete
    Replies
    1. पुणे विद्यापीठात जर्मनच्या प्राध्यापिका असलेल्या नीती बडवे यांनी 'निवडक काफ्का' असं एक काफ्काच्या काही वेच्यांचं, गोष्टींचं असं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. प्रकाशन : साहित्य अकादमी.
      http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b58855&lang=marathi

      Delete
  2. Look at the quality of Sarang's response: "आजचं वर्तमानपत्र वाचता वाचता आपण काफ्का वाचतो आहोत असं जोपर्यंत वाटू शकतं, तोपर्यंत काफ्का ताजाच वाटणार"...Sarang is such a master...

    I have still not seen Orson Welles's 'The Trial' but will see it soon and as you all may know Welles is probably Shakespeare of film making and he was so proud that he made that film.

    Welles said: "I feel an immense gratitude for the opportunity to make it, and I can tell you that during the making of it, not with the cutting, because that's a terrible chore, but with the actual shooting of it, that was the happiest period of my entire life. So say what you like, but THE TRIAL is the best film I have ever made...THE TRIAL is made for no public, for every public, not for this year, for as long as the film may happen to be shown. That is the gift of gifts."

    What joy! And this comes from the maker of "Citizen Kane" and, my love, "The Magnificent Ambersons"! Is it because of greatness of Kafka?

    ReplyDelete