Wednesday, 18 April 2012

सोनी सोरी यांना वाचवा

सोनी सोरी ही ३५ वर्षांची छत्तीसगढमधील आदिवासी शिक्षिका ऑक्टोबर २०११पासून रायपूर तुरुंगात आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या वादात सोरी भरडल्या गेल्या.

नक्षलग्रस्त दांतेवाडामध्ये गेल्या वर्षी सोरी यांनी स्वातंत्रदिनानिमित्त ध्वजवंदन करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांना धमकावले. सोरी यांचे वडील पोलिसांचे खबरे आहेत, असे सांगत नक्षलवाद्यांनी त्यांच्या पायावर गोळी झाडली. एवढं कमी नाही म्हणून की काय, पोलिसांनी सोरी यांच्या पतीलाच अटक केली आणि नंतर सोरी याही नक्षलवाद्यांच्या समर्थक आहेत, असे सांगून त्यांना अटक करण्यात आली.
तुरुंगात सोरी यांच्यावर पोलिसांनी भयानक अत्याचार केले.

यासंबंधी 'रेघे'वर पूर्वी एक पोस्ट प्रसिद्ध केली होती - त्यांनी बोलायची हिंमत दाखवली, पण दांतेवाडात असलं चालत नाही

सध्या 'तेहेलका' साप्ताहिक सोरी यांच्या सुटकेची मागणी करत मोहीम राबवत आहे. त्या मोहिमेला थोडा हातभार म्हणून 'रेघे'वर ही पोस्ट. बाकी तपशील इथे वाचता येईल - Save Soni Sori