कवी नामदेव ढसाळ यांचं १५ जानेवारीला निधन झालं. त्या निमित्ताने ही नोंद इथे प्रसिद्ध होतेय.
'चळवळ' हा शब्द अनेक जण अनेक अर्थांनी वापरत असतील. या सगळ्या अर्थांनी बोलणं काही आपल्याला जमण्यासारखं नाही. पण ज्या ढसाळांच्या निधनाच्या निमित्ताने आपण बोलतोय त्यांची नि त्यांच्या कवितेची दलित चळवळीशी बांधिलकी होती असं खुद्द तेही म्हणत. शिवाय १९६०च्या दशकात अनियतकालिकांची चळवळ झाली, असंही म्हटलं जातं आणि या चळवळीशीही ढसाळांचा संबंध होता. तर, ह्या अनियतकालिकांच्या चळवळ प्रकरणासंदर्भात कवितेबद्दल लहानसं काही नोंदवता आलं तर पाहू. काही लोक एकत्र येऊन काही ना काही हालचाल करत राहातात, त्यांचे एकमेकांवर किंवा आसपासच्या भवतालावर परिणाम होत राहतात, या अर्थानं या नोंदीत 'चळवळ' हा शब्द वापरला आहे. ढसाळांच्या निमित्ताने आपण बोलतोय. या निमित्तामधे ढसाळांचे समकालीन कवी तुळसी परब आणि मनोहर ओक यांनाही आणतोय. का, ते नोंद पुढे जाईल तसं स्पष्ट होईल अशी आशा. आता पहिल्याच्या निमित्ताने नवीन दोघांसह पुढे जाऊ.
नामदेव ढसाळ (१५ फेब्रुवारी १९४९ - १५ जानेवारी २०१४) [छायाचित्र : हेनिंग स्टेगमुलर] |
'चळवळ' हा शब्द अनेक जण अनेक अर्थांनी वापरत असतील. या सगळ्या अर्थांनी बोलणं काही आपल्याला जमण्यासारखं नाही. पण ज्या ढसाळांच्या निधनाच्या निमित्ताने आपण बोलतोय त्यांची नि त्यांच्या कवितेची दलित चळवळीशी बांधिलकी होती असं खुद्द तेही म्हणत. शिवाय १९६०च्या दशकात अनियतकालिकांची चळवळ झाली, असंही म्हटलं जातं आणि या चळवळीशीही ढसाळांचा संबंध होता. तर, ह्या अनियतकालिकांच्या चळवळ प्रकरणासंदर्भात कवितेबद्दल लहानसं काही नोंदवता आलं तर पाहू. काही लोक एकत्र येऊन काही ना काही हालचाल करत राहातात, त्यांचे एकमेकांवर किंवा आसपासच्या भवतालावर परिणाम होत राहतात, या अर्थानं या नोंदीत 'चळवळ' हा शब्द वापरला आहे. ढसाळांच्या निमित्ताने आपण बोलतोय. या निमित्तामधे ढसाळांचे समकालीन कवी तुळसी परब आणि मनोहर ओक यांनाही आणतोय. का, ते नोंद पुढे जाईल तसं स्पष्ट होईल अशी आशा. आता पहिल्याच्या निमित्ताने नवीन दोघांसह पुढे जाऊ.
तुळसी परब यांनी चंद्रकान्त पाटील यांच्यासोबत 'मनोहर ओकच्या ऐंशी कविता' (लोकवाङ्मय गृह. दुसरी आवृत्ती : जानेवारी १९९९) हे पुस्तक संपादित केलं. या पुस्तकात मनोहर ओकांसंबंधी नि त्यांच्या कवितेसंबंधी दोघाही संपादकांचे लेख आहेत. यात परबांनी ते मुंबईला सचिवालयात असतानाचे काही अनुभवही नोंदवलेत. नामदेव ढसाळ, मनोहर ओक आणि परब यांचा तेव्हा एकमेकांच्या आसपास वावर होता. मैत्री होती असं काही लगेच इथे लिहावं वाटत नाही. तर, त्यासंबंधी परब लिहितात :
त्यावेळी आमच्या तिघांमध्ये प्रचंड सामुहिक कवितावाचन चालत असे. आम्ही तेव्हा एकमेकांना कविता घेऊनच भेटत असू.नामदेव आणि मनोहरमध्ये हळूहळू फरक पडत चाललेला मला दिसत होता. त्याची एक दोन उदाहरणे सांगण्यासारखी आहेत.सरकारी कारकुनांच्या टेबलावर असतो तसा एकेक पेपरवेट माझ्या टेबलावर पडलेला असे. एकदा नामदेव माझ्या शेजारी बसून पेपरवेटशी चाळा करत होता. तेवढ्यात मनोहर आला. त्यानं नामदेवच्या हातातला पेपरवेट घेतला आणि तो मला म्हणाला, ''साल्या तू दगड आहेस. वर तुला पेपरवेट कशाला? आधीच तू सगळ्या सरकारी कागदांवर नुसता झोपून राहतोस. मी आता या पेपरवेटची काय जादू करतो पाहा.'' मग तो पेपरवेट माझ्या टेबलावर नुसता फिरवत राहिला. मनोहरची कधी काय लहर लागेल त्याचा पत्ता नसायचा. म्हणून मी त्याला थोडा टरकूनच असे. त्याचा भोवरा थांबल्यानंतर तो काचेच्या पेपरवेटच्या आतल्या बुडबुड्यांकडे पाहत राहिला. नामदेवला म्हणाला, ''नाम्या, या पेपरवेटवर कविता लिहायची.'' मी या वेळी अंग काढून घेतलं. नामदेव म्हणाला, ''तू आधी लिही, मग मी लिहीन.'' दुसऱ्या दिवशी मनोहर या संग्रहातील कविता क्र. ६७ 'एकुलतेपणाच्या पेपरवेटमधील' ही कविता घेऊन लंच-अवरमधे हजर झाला. त्यातला 'कोणत्याही क्षणी बाजूला सारला जाणारा । कांतीमान निर्लेब उघड पेपरवेट अस्पृश्यासारखा दबलेला नर्म ।' ही ओळ नामदेवला लागली. तिसऱ्या दिवशी नामदेव त्याची 'पेपरवेटमध्ये माणसं कुणी कोंडून टाकलीत' ही कविता घेऊन हजर झाला. या दोन कविता एकमेकांशेजारी ठेवून कुणालाही दोन वेगवेगळ्या धोरणांची जुगलबंदी सहज बघता येईल.
परबांनी ज्या जुगलबंदीची अपेक्षा ठेवलेय, ती इथं या नोंदीत घडवायची आपली इच्छा होती पण यातली ढसाळांची कविता रेघेला उपलब्ध झाली नाही. पण हा मुद्दा तेवढ्याच कवितेपुरता अर्थातच मर्यादित नाहीये. दुसरं एक उदाहरण आहे झाडासंबंधीचं. वरती उल्लेख केलेल्याच लेखात परबांनी लिहिलंय :
मनोहरच्या 'झाड' कवितेची गोष्ट थोडी मजेशीर आहे.... ही 'झाड' कविता नामदेवलासुद्धा तेव्हा खूप आवडली होती. (या आवडीचा उल्लेख चंद्रकान्त पाटलांच्याही लेखात आलेला आहे. 'अशी कविता लिहिता यायला पायजे', असं ढसाळ पाटलांना एकदा म्हणालेले.) मात्र नामदेवचं 'व्हायलन्सचं झाड' पूर्णतः वेगळ्या ध्रुवावरचं आहे.
ढसाळांची ही वेगळ्याच झाडासंबंधीची कविता साडेसहा पानं पसरलेली आहे, त्यामुळे सगळी इकडे नोंदवणं शक्य नाही. पण या कवितेची सुरुवात आणि शेवट इथे नोंदवूया. अशा अर्धवटपणासाठी माफी, वाचकांना मूळ कविता ढसाळांच्या 'मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले' (लोकवाङ्मय गृह) या कवितासंग्रहात सापडेल.
सुरुवात :
तुळशीवृंदावनासारखे त्यांनी आपल्या दारासमोर व्हायलन्सचे झाड लावले. लावणे अटळ होते. ते रोज झाडाला भक्तिभावनेने पाण्याऐवजी रक्त घालू लागले. खत म्हणून मांससुद्धा. नाकर्तेपणाचा चेहरा घेऊन येणारा सूर्य वरातीतला नवरा बनून पृथ्वीवर अवतरत होता. प्रत्येक संध्याकाळी नित्यनियमाने मरत होता. सूर्यमंडळे तारामंडळे यांचा शिवणापाण्याचा खेळ रोजच चालू होता. व्हायलन्सचे झाड वाढत होते. कणाकणाने आकाशाचा वेध घेत होते. माणसाचे रक्त पिणाऱ्या तस्करी शहराची हवा झाडाला भलतीच मानवत होती.
शेवट :
झाडाची शेकडो हजारो लाखो कोट्यवधी झाडेझाडे झाडे झाडेच झाडे वाढत जातीलपरिस्थितीवर घाव न घालणारं शासन मोडलं जाईलजनतेकडून राजरोस मारलं जाईलपार्लमेंट भातखेचरात भरून जाईलमांगवाड्यातनं, मेहतरवाड्यातनंमहारवाड्यातनं, चांभारवाड्यातनं शेतकारखान्यातनंतोरणं गुंफली जातील नव्या देशाच्या वेशीसाठीआणि व्हायलन्सचं झाड देशाच्या आयुष्यातकल्पतरूची भूमिका बजावेलबजावेल.
ओकांची झाड कविता सुरू होते अशी :
झाडहे झाड नसतंएक जंगल
अवघं साम्राज्य
हिरवी अभेद्य गढी
पानबंदी चहुवार
परतवत सूर्य
नमवत वारा
आणि संपते अशी :
झाड बेफिकीरपणे लुटवतंसावली, असावध म्हशींवरगाई-बकऱ्यांवरयेणारे मोहोर दरवळतेवयात येणारी फळं डोलदारगाणारे कोकिळ का कर्कटणारे कावळेवाढणारे अंगावर वेल, फुलहीन वा ऋतुमती
या अवांतर घटनात संभवत नाही ते
ते असतं तेच मुळी निवांत म्हणून
जे असतं तेच मुळी एक आरोप घेऊन
या दोन झाडांबद्दल वाचकांनी आपापलं मत बनवावं. पेपरवेटसंबंधीची जी जुगलबंदी अपेक्षित होती ती इथे तितकी नाहीच. पण तरी..
तरीही असं खूप शोधता येऊ शकतं. त्या काळच्या परिसराशी या हालचालींचा संबंध, शब्दांचा संबंध, एकूण वातावरणातलं वारं, याचा परिणाम होत होत काय काय कसं घडत गेलं असेल? परबांनी ओक आणि ढसाळ यांच्यासोबतच्या त्यांच्या अनुभवांबद्दल लिहिलेलं आपण वाचलं आणि या अनुभवांमधून काही कविता कशा उभ्या राहिल्या तेही त्यात आलंय. यात सुटा कवी महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबतीनं त्याच्या आसपासातल्या घडामोडी तेव्हा चळवळ म्हणता येईल अशा जोरकसपणे घडत होत्या असतील का? आणि या जोरकसपणात एकमेकांना आधारही मिळत असल्यामुळे पुन्हा जोरकसपणाला जोर मिळत असेल का? तपासायला हवं. इथे आपण वर काही उदाहरणं नोंदवली. तशी आणखीही देता येईल.
आणखी उदाहरणार्थ, मुंबईवर ढसाळांनी लिहिलेली कविता
तर, ओकांना मुंबईत गुदमरल्यासारखं वाटतं. म्हणून ते म्हणतात :
अनियतकालिकांशीच संबंधित आणखी एक कवी अरुण कोलटकर यांनी या मुंबईनं भिकेस लावलं हे एका कवितेतून नोंदवलं होतं, तेही इथे आठवू शकतं (अरुण कोलटकरच्या कविता, प्रास प्रकाशन, ऑगस्ट २००७). कोलटकरांना आपण यात जास्ती आणत नाहीयोत, कारण परबांच्या ज्या अनुभवाच्या सोबतीनं आपण ही नोंद करतोय त्या अनुभवात त्यांच्यासोबत ढसाळ आणि ओक होते. पण तरी-
तरी तरी खूप काही शोधता येईल. परत उदाहरणार्थ, ढसाळांच्या गोलपीठ्यात 'पाणी' नावाची एक कविता आहे. त्यात शेवटाकडे ते म्हणतात :
परबांचा बाजारात कदाचित उपलब्ध असलेला एकमेव कवितासंग्रह आहे - कुबडा नार्सिसस (लोकवाङ्मय गृह, पहिली आवृत्ती मे २००२). या कवितासंग्रहातल्या पहिल्या कवितेचं नाव आहे - 'पाणी : निळेभोर । काळे । सावळे ।'
मुळातला मुद्दा आपण काहीसा स्पष्ट करत आणला असावा अशी अपेक्षा आहे. चळवळ या शब्दाची प्रत्यक्षातली अंमलबजावणी घोषणांमधून किंवा व्यक्तिगत हेव्यादाव्यांमधून पण होत असावी. ती अगदी या अनियतकालिकांच्या घडामोडींमधेही झालेली सापडू शकेल. पण त्यापलीकडेही काही १९६०च्या दशकातल्या या शब्दांच्या वावरात सापडेल. तेही परबांच्या शब्दांत एकदा शेवटचं नोंदवूया, ते म्हणतात :
***
जोड नोंद : १९६०च्या आसपास सुरू झालेल्या अनियतकालिकांच्या चळवळीबद्दल ढसाळांच्या निमित्ताने आपण काही मुद्दा नोंदवला, पण मुळात ती चळवळच नव्हती, असं मत या घडामोडींना जोर देणाऱ्या प्रमुख मंडळींपैकी एक अशोक शहाणे यांनी एकदा दिलेलं आहे. 'पण काही झालं तरी झाल्या प्रकाराला चळवळ म्हणणं काही बरोबर नाही', असं त्यांचं म्हणणं. आपल्या नोंदीतला मुद्दा तर या म्हणण्याच्या उलटा. आणि तो मुद्दा लागू करायचा झाला तर-
शहाण्यांच्या 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर क्ष किरण' या १९६३ साली गाजलेल्या लेखाच्या घडणीत भालचंद्र नेमाडे यांचा हातभार आहे, हे शहाण्यांनीच त्यांच्या 'नपेक्षा' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी २००५मध्ये उघड केलं होतं. आणि नेमाडे यांनी 'कोसला'बद्दल एकदा असं नोंदवलेलं : ही कादंबरी वाचून जर कुणाला वैताग आला तर आम्ही त्याची माफी मागूं. मात्र ही मोठ्यानं वाचावी. मनांतल्या मनांत वाचूं नये. चांगली वाटल्यास ज्यानं त्यानं अशोक शहाण्यांचे आभार मानावेत.
हे जे एकमेकांचे आधार आपापल्या घडामोडींना लागलेत ते मान्य केल्यावर या आधाराला कोणी चळवळ म्हटलं तर काय हरकत. भाषेशी जवळीक साधायची एक चांगली हातोटी या आधारांमधून प्रवाहात कशी आली हे उलट यात जास्तीचं स्पष्ट होईल.
हरकत घ्यायचीच तर यातल्या काही मंडळींच्या एका कंटाळवाण्या सवयीवर घेता येईल. आपलं काही चुकलं असेल असं उघडपणे मानायचं नाही, आपल्याला काही बाबतीत कमी माहिती असेल हे उघडपणे कबूल करायचं नाही आणि उघडीबाघडी शेरेबाजी करत राहायची ही (तशी नेहमीच वातावरणात असलेली पण या घडामोडींमुळे जास्त जोर मिळालेली) सवय या चळवळीतल्या अनेकांना होती. या सवयीची झाडं मात्र वर्तमानपत्रांपासून फेसबुकपर्यंत रुजलेली दिसतील. ज्या चळवळीच्यासंबंधीची ही नोंद आहे तिला काय वाट्टेल ते म्हटलं तरी एक वेळ चालेल, पण त्यात असलेली किंवा त्यात नसलेलीही एकेक म्हातारी झाडं कोलमडत असताना नवीन बरं-वाईट काय रुजलं किंवा रुजतंय हे तपासायला हवं. हे काम रेघेच्या क्षमतेबाहेरचं आहे, पण सक्षम लोकांना ते करता येईल.

मुंबई, मुंबई, माझ्या प्रिय रांडेअशी सुरू होते. (कवितासंग्रह - खेळ. प्रास प्रकाशन. प्रकाशन - नाताळ १९८३)
ये व माझा स्वीकार कर
सात घटकेचा मुहूर्त
आधीव्याधीनंतर
सर्वांगसुन्दर प्रतिमासृष्टी
अश्विनीरूप ऋतुस्नात कामातुर लक्ष्मी
सर्पस्वरूप विष्णू उर्ध्वरेत स्खलित
सूर्याचे अनुष्ठान
हे शेष सूर्याच्या चेहऱ्या
हे कामेच्छेच्या माते
हे अदिती
माझ्या प्रियेचा दगड
मला अधिकच प्रिय आहे
तर, ओकांना मुंबईत गुदमरल्यासारखं वाटतं. म्हणून ते म्हणतात :
मी गुदमरतोय या मुंबईत- अशी सुरू होणारी त्यांची मुंबईवरची कविता
दारू पिऊन पावलं नीट पडतात
उघडा दरवाजे मोकळ्या खिडक्या
सुटी हवा द्या खुली मोकळी
झुगारून दे बागुल संबंधांचे- अशी संपते.
या शरीराचं पान आत उघड कर
सगळी पदरीची लालूच वाऱ्याला दे.
अनियतकालिकांशीच संबंधित आणखी एक कवी अरुण कोलटकर यांनी या मुंबईनं भिकेस लावलं हे एका कवितेतून नोंदवलं होतं, तेही इथे आठवू शकतं (अरुण कोलटकरच्या कविता, प्रास प्रकाशन, ऑगस्ट २००७). कोलटकरांना आपण यात जास्ती आणत नाहीयोत, कारण परबांच्या ज्या अनुभवाच्या सोबतीनं आपण ही नोंद करतोय त्या अनुभवात त्यांच्यासोबत ढसाळ आणि ओक होते. पण तरी-
तरी तरी खूप काही शोधता येईल. परत उदाहरणार्थ, ढसाळांच्या गोलपीठ्यात 'पाणी' नावाची एक कविता आहे. त्यात शेवटाकडे ते म्हणतात :
नदी राखते जन्मसिद्ध हक्क माण्सावरला(गोलपीठा, लोकवाङ्मय गृह, पाचवी आवृत्ती - जुलै २००८)
आम्ही जिथं जिथं पाय टाकू तिथं तिथं फुटतील उपाळ निवाळचंग पाण्याचं
आणि मग आमच्यासकट कुणीच राहणार नाही तहानेला
आणि भाजणार नाही हीर पाण्याचा
पाण्याला जातीय रंग देणारा तुमचा
एकुलता एक ईश्वर त्याला लागेल आफलातून बुळगा
न मग तुम्ही धोतराचे सोगे ओले ठेवण्यासाठी
मागाल भीक पाण्याची
आम्ही तुम्हाला पाण्याने भरलेले रांजण देऊ
हे छळकऱ्यांनो
पाण्यासारखं सुंदर कर्तव्य दुसरं कुठलंच नस्तं जगात
पाणीटंचाई आली तर
तुम्ही शर्टासारखी शहरं बदलता
मग सांगा पाण्यावाचून तडफडून मरणारांनी
काय बदलावं
परबांचा बाजारात कदाचित उपलब्ध असलेला एकमेव कवितासंग्रह आहे - कुबडा नार्सिसस (लोकवाङ्मय गृह, पहिली आवृत्ती मे २००२). या कवितासंग्रहातल्या पहिल्या कवितेचं नाव आहे - 'पाणी : निळेभोर । काळे । सावळे ।'
मी तुम्हाला सांगतोय- असं परबांनी म्हटलंय. ही कविता पूर्ण वाचण्यासाठी वरती तिचं नाव दिलंय त्यावर क्लिक करा. ढसाळ ज्या पाण्याबद्दल बोलत होते त्या पाण्यात आणि परबांच्या कवितेतल्या पाण्यातही काही थेंब सारखे सापडतील.
ती सगळी पाण्याची हकिगत नाही
ही हकिगत आहे
पातळ्यांवर
जगणाऱ्या दुर्दम्य माणसांची
मुळातला मुद्दा आपण काहीसा स्पष्ट करत आणला असावा अशी अपेक्षा आहे. चळवळ या शब्दाची प्रत्यक्षातली अंमलबजावणी घोषणांमधून किंवा व्यक्तिगत हेव्यादाव्यांमधून पण होत असावी. ती अगदी या अनियतकालिकांच्या घडामोडींमधेही झालेली सापडू शकेल. पण त्यापलीकडेही काही १९६०च्या दशकातल्या या शब्दांच्या वावरात सापडेल. तेही परबांच्या शब्दांत एकदा शेवटचं नोंदवूया, ते म्हणतात :
आम्हा तिघांच्यात तेव्हा कविता-लेखनाच्या बाबतीत निर्वैर स्पर्धा चाले. 'सुहास राखेचा आणि संगमरवराचा चेहरा' ही कविता नामदेवला खूप आवडली होती. आपल्या 'मंदाकिनी पाटील : मला अभिप्रेत असलेलं कोलाज'वर या कवितेचा प्रभाव असल्याचं त्यानं मान्य केलं होतं. अर्थात दोन्ही ठिकाणी रसायन वेगवेगळ्या प्रकारचं आहे.नामदेव ढसाळ चळवळीचे कवी होते असं म्हणताना 'चळवळ' या शब्दाचे म्हटलं तर बारकेसारके पण कवितेच्या बाबतीत इंटरेस्टिंग ठरू शकणारे मुद्दे लक्षात ठेवावे वाटले तर ठेवता येतील. यात व्यक्तीच्या कामाचं महत्त्व कमी करण्याचा काही संबंध नाही, उलट व्यक्तीच्या आसपासाचा काही अंदाज त्यातून बांधावा वाटला म्हणून फक्त. आणि त्या आसपासामधून या व्यक्तींना काय सापडलं ते तपासावं वाटलं म्हणूनही. हा आसपास कसाही असू शकतो. ढसाळांच्या वेळी तो जसा होता तसा होता आणि आता जसा आहे तसा आहे. यात चळवळीचा मुद्दा आला तो प्रत्येक वेळी असायलाच हवा या आग्रहाने नाही, तर तो जेव्हा लागू होता तेव्हा त्याचा परिणाम कसा झाला याची नोंद करण्यासाठी आला.
एवढं सगळं सांगत बसणं म्हणजे आत्मप्रौढी केल्यासारखं होईल म्हणून आता आटोपतं घ्यायला हवं. पण चळवळीच्या संदर्भात अशा अनेक घटना घडत असतात आणि म्हणूनच तिला चळवळ म्हणतात.
***
जोड नोंद : १९६०च्या आसपास सुरू झालेल्या अनियतकालिकांच्या चळवळीबद्दल ढसाळांच्या निमित्ताने आपण काही मुद्दा नोंदवला, पण मुळात ती चळवळच नव्हती, असं मत या घडामोडींना जोर देणाऱ्या प्रमुख मंडळींपैकी एक अशोक शहाणे यांनी एकदा दिलेलं आहे. 'पण काही झालं तरी झाल्या प्रकाराला चळवळ म्हणणं काही बरोबर नाही', असं त्यांचं म्हणणं. आपल्या नोंदीतला मुद्दा तर या म्हणण्याच्या उलटा. आणि तो मुद्दा लागू करायचा झाला तर-
शहाण्यांच्या 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर क्ष किरण' या १९६३ साली गाजलेल्या लेखाच्या घडणीत भालचंद्र नेमाडे यांचा हातभार आहे, हे शहाण्यांनीच त्यांच्या 'नपेक्षा' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी २००५मध्ये उघड केलं होतं. आणि नेमाडे यांनी 'कोसला'बद्दल एकदा असं नोंदवलेलं : ही कादंबरी वाचून जर कुणाला वैताग आला तर आम्ही त्याची माफी मागूं. मात्र ही मोठ्यानं वाचावी. मनांतल्या मनांत वाचूं नये. चांगली वाटल्यास ज्यानं त्यानं अशोक शहाण्यांचे आभार मानावेत.
हे जे एकमेकांचे आधार आपापल्या घडामोडींना लागलेत ते मान्य केल्यावर या आधाराला कोणी चळवळ म्हटलं तर काय हरकत. भाषेशी जवळीक साधायची एक चांगली हातोटी या आधारांमधून प्रवाहात कशी आली हे उलट यात जास्तीचं स्पष्ट होईल.
हरकत घ्यायचीच तर यातल्या काही मंडळींच्या एका कंटाळवाण्या सवयीवर घेता येईल. आपलं काही चुकलं असेल असं उघडपणे मानायचं नाही, आपल्याला काही बाबतीत कमी माहिती असेल हे उघडपणे कबूल करायचं नाही आणि उघडीबाघडी शेरेबाजी करत राहायची ही (तशी नेहमीच वातावरणात असलेली पण या घडामोडींमुळे जास्त जोर मिळालेली) सवय या चळवळीतल्या अनेकांना होती. या सवयीची झाडं मात्र वर्तमानपत्रांपासून फेसबुकपर्यंत रुजलेली दिसतील. ज्या चळवळीच्यासंबंधीची ही नोंद आहे तिला काय वाट्टेल ते म्हटलं तरी एक वेळ चालेल, पण त्यात असलेली किंवा त्यात नसलेलीही एकेक म्हातारी झाडं कोलमडत असताना नवीन बरं-वाईट काय रुजलं किंवा रुजतंय हे तपासायला हवं. हे काम रेघेच्या क्षमतेबाहेरचं आहे, पण सक्षम लोकांना ते करता येईल.
This comment has been removed by the author.
ReplyDelete"शहाण्यांच्या 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर क्ष किरण' या १९६३ साली गाजलेल्या लेखाच्या घडणीत भालचंद्र नेमाडे यांचा हातभार आहे, हे शहाण्यांनीच त्यांच्या 'नपेक्षा' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी २००५मध्ये उघड केलं होतं. "...
ReplyDelete...Sure he 'disclosed' it decades after the essay was published but could not he 'announce' it as a part of the book when it was published or when its second edition came out in 2008?
Aniruddha, yes, he should have done that.
Deletehttp://searchingforlaugh.blogspot.in/2013/10/ashok-shahane-confesses-but-i-feel.html
ReplyDeleteतुमच्या वरील नोंद वाचल्या नंतर मागच्या आठवड्यात लोकसत्ता मधला चंद्रकांत पाटलांचा सदर लेख वाचनात आला
ReplyDeleteखाली त्याची लिंक देत आहे चिकित्सकांनी जरूर वाचवा ढासळ आणि मनोहर ओंक यांच्या कवितां मधील साम्य आणि फरक छान नोंदवला आहे
http://epaper.loksatta.com/c/2301539