एक
अरुण कोलटकरांची 'परंपरा' ही कविता (पान ५३-७४) 'अरुण कोलटकरच्या चार कविता' (प्रास प्रकाशन) या पुस्तकात आहे. ही कविता 'सोपी' असली असती तर गोष्ट वेगळी, पण ती 'सोप्पी' आहे, असं वाचक म्हणून बनलेलं मत फक्त आपण इथं नोंदवतो आहोत. ती सोप्पी का वाटते, तर-
या कवितेची सुरुवात आहे:
परंपरा
आई आहे आपली
सर्वांचीच
कबूलाय
तिच्या पोटातच आपण वाढलो
मानतो मी
पण बाहेर आलो
की नाळ तोडावीच लागते
की नाही?
जन्मभर ती
कमरेला गुंडाळून
हिंडायला तर येत नाही?
परंपरा
आई आहे आपली
सर्वांचीच
तिचंच दूध आपण प्यालो
आनंदानं
आणि बिनतक्रार
त्यात डीडीटीचं
आणि डायॉक्सिनचं प्रमाण
कमीजास्ती असलं
तरी गोड मानून घेतलं आपण
जन्मभर ते दूध
पुरणार नाही
असं वाटलवंतं कुणाला?
आई हे परंपरेचं रूपक म्हणून वापरलंय. पण परंपरेचं प्रकरण इतकं सोपं वाटत नाही. आईची जन्मतारीख नि मरणाची तारीख कागदोपत्री कळू शकते. आई नावाची कायतरी शरीर असलेली गोष्ट दिसते, तसे आपण परंपरेतून बाहेर येतो, असं वाटत नाही. आई हे रूपक परंपरेसाठी अगदीच तोकडं आहे. म्हणून पुढं जाऊन तर कोलटकरांना कवितेत परंपरेच्या 'डेथ सर्टिफिकेट'चीही गोष्ट करणं सोपं झालेलं आहे:
पण परंपरेच्या बाबतीत
ती मेली
की नुसतीच कोमात आहे
आणि कोमात असेल
तर ती कोमातच राहणार अशी
कायमची
की त्यातनं बाहेर पडायची
शक्यता आहे
हे मोठ्यामोठ्या तज्ज्ञांनाही
सांगता येत नाही
तिला डेथ सर्टिफिकेट द्यायलाही चट्कन
तयार होत नाही कुणी
दोन
चार जून २०१६ रोजीच्या 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'च्या अंकात 'सरकारसाठी मैलासफाई' (स्कॅव्हेंजिंग फॉर द स्टेट) असा एक लेख आलेला आहे. अनघा इंगोले यांनी लिहिलेल्या या लेखासाठीच्या संशोधनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील (बार्टी) संशोधकांचा सहभाग राहिल्याचं तिथं नोंदवलेलं आहे. पुणे महानगरपालिकेतील (नाला सफाई व शौचालय सफाई करणाऱ्या) १०९१ कामगारांचं सर्वेक्षण आणि प्रत्येक कामगाराची वैयक्तिक मुलाखत घेऊन हा अभ्यास करण्यात आल्याचं म्हटलंय.
परंपरागतरित्या हाती सफाईकामामध्ये गुंतलेल्या कुटुंबांमधूनच आपण आल्याचं या सर्वेक्षणामधील बहुतांश कामगारांनी सांगितलं, असं लेखात नोंदवलंय:
परंपरा म्हणजे काय? तिची डेथ कधी होते? तिची डेथ झालेला असा एक काळाचा ठिपका सांगता येतो का? वरच्या लेखात वाल्मिकी जातीतल्या राजेश संतू या ३६ वर्षीय सफाई कामगाराचं एक उदाहरण दिलंय, त्यांना त्यांच्या भागातल्या 'सुलभ शौचालय'वर देखरेखीचं काम मिळालं. या कामासोबत त्याच शौचालयाच्या वरती राहायला जागाही मिळाली. यातून त्यांचं जगणं सुकर झालं की कसं? त्यांच्या घरात येणारा वास आणि या कामामुळं त्यांनी गमावलेलं सार्वजनिक जीवन, यांचं काय करायचं? शौचालय आणि राजेश यांचं घर यांच्यातला फरक रात्रीच्या वेळी कोणा दारुड्यांना ओळखता येत नाही, मग संतूंच्या घरात मधेच कोणीतरी लडबडत येतं, याचं काय करायचं? आणि जातिव्यवस्था हा एक आपल्याकडच्या परंपरेचा भाग आहे, असं मानलं; तर त्यातल्या विशिष्ट जातींनाच या सफाईकामात का गुंतावं लागतंय, हा मुद्दा निव्वळ परंपरेला आईचं रूपक जोडून समजेल का?
शिवाय जातिव्यवस्था हा एकच भाग झाला. अख्ख्या परंपरेचा एक भाग. पण परंपरेसोबत भाषाही आली, आपल्या जन्मापूर्वीपासून अनेकानेकांच्या सोबतीनं नांदलेली. त्यातच कोलटकरांनी कविता लिहिली. जातिव्यवस्थेचं तरी थोडं स्पष्टपणे सांगता येईल, पण भाषाव्यवस्थेच्या बाबतीत आईचं रूपक कितीसं पुरं पडेल? कोलटकरांनी लिहिलेली ही 'परंपरा' कविता नक्की कुठल्या काळात लिहिली माहीत नाही, पण त्यांच्याच आसपास लिहू लागलेले भालचंद्र नेमाडे 'परंपरा' या गोष्टीबद्दल जे बोलतात, त्याचा संदर्भ या कवितेसोबत आपल्याला नोंदवायला हवा. नेमाडे अनेकदा 'परंपरा' या गोष्टीचं वेगळं सोप्पं रूप उभं करतात:
कोलटकरांची कविता आहे. नेमाड्यांचं भाषण आहे. यात फरक पडतोच. शिवाय नेमाडे परंपरेबद्दल अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी काही बरं-वाईट बोललेले आहेत (वरच्या भाषणात एका ठिकाणी, 'परंपरा आणि आधुनिकता दोन्ही एकाच वेळी पुढे जात असतात' असं आलंय). पण हे अर्थातच बरचंसं सोपेकरण आहे. कोलटकरांची कविता नुसतीच सोप्पी आहे, नेमाड्यांच्या कादंबरीबाहेरच्या गद्य मांडणीत परंपरेबद्दल जे येतं त्यात तर भीषण विरोधाभाससुद्धा आहेत. 'परंपरेला नाकारण्यात अर्थ नसतो, त्यात फार प्रश्न विचारू नयेत, कारण त्यामागचे हेतू आपल्याला माहीत नसतात, ते वर्षानुवर्षांच्या ज्ञानातून चालत आलेले असतात'- हे तर आणखीच भयंकर. राजेश संतूंच्या घरात जाऊन हे वाक्य बोलल्यावर कसं वाटेल? तर या दोन लेखकांना इथंच थांबवून आपण नोंदीच्या तिसऱ्या भागात जाऊ.
तीन
'जनुकं' हे परंपरेचं एक रूपक म्हणून वापरता येईल का? आपल्या स्वभावावर, रोजच्या वागण्यावर, आपल्या असण्यावर जनुकांचं मोठंच 'नियंत्रण' असतं, असं विज्ञानातले लोक सांगतात. शिवाय ही जनुकं फक्त आईकडून नव्हे तर बापाकडूनही येतात. खरंतर त्याच्याही आधीपासून कुणाकुणाकडून. त्यातही आई-बापात झोपलेली काही जनुकं आपल्या शरीरात जागी असू शकतात; किंवा त्यांच्यात जागी असलेली काही जनुकं आपल्यात झोपून जाऊ शकतात. दोन्हीकडून नक्की किती किती जनुकं आपल्यात आली याचा पत्ता नाही. सरमिसळ कितीतरी. त्यातही जाणीवपूर्वक हीच जनुकं पुढं टाकू नि थोडीशी राखून ठेवू, असा काही मामला (अजून तरी सरसकट) नाही. त्यात मग आई-बापांच्या दोन्ही बाजूंचा 'कूळवृत्तान्त' शोधलात तरी कळून कळून असं काय कळणार आहे? शिवाय 'आई' असं आपण ज्या व्यक्तीला म्हणतो ते शेवटी एक शरीर असतं. कोणाला समजा आपली आई-वडील यांची ओळखच नसेल, लहानपणीच काही घटनांमुळं एखादी व्यक्ती अनाथ झाली असेल, आणि नंतर तिला कोणी दत्तक घेतलं असेल, तर ती शारीरिक जन्मदात्यांपेक्षा वेगळ्याच कोणाला तरी 'आई' म्हणेल. असा हा शब्दाचा म्हणजे परंपरेचा गुंता खोलवर जाईल. परंपरेची गुंतागुंत ही अशी जनुकांसारखी असते असं वाटतं. त्यामुळं तिचं डेथ सर्टिफिकेट ही गोष्ट बोलायला सोपी आहे, पण प्रत्यक्षात आपल्या स्वतःच्या डेथपर्यंत लांबणारा हा मुद्दा आहे असं वाटतं.
रिचर्ड डॉकिन्स यांच्या 'द सेल्फिश जीन' (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, २००९) या पुस्तकात 'मीम्स' अशी एक संकल्पना वापरलेय (पान १८९-२०१). हे एक प्रकारचे सांस्कृतिक घटक मानलेत डॉकिन्सनी. ते शरीरात नसतील, पण इकडून तिकडून भाषेतून वगैरे ते असे पाझरत जातात. या पुस्तकापलीकडं या विषयाचा फारसा अदमास रेघेला नाही. पण 'मीम्स'चा मुद्दा जादा ताणणं विज्ञानाच्या काटेकोरपणात बसणारं नाही, असं काही लोक म्हणतात असं थोडंसं वाचनात येतं. पण 'कविकल्पना' म्हणून हे इंटरेस्टिंग वाटतं. 'मीम्स'ला मराठीत काय म्हणायचं? 'मनुकं' कसं वाटतं? म्हणजे बाहेरून खायची गोष्ट आणि मनाशी संबंधित असलेली, असे अर्थ त्यात येऊ शकतील.
म्हणजे मराठी भाषा ही एक परंपरा किंवा परंपरेचा भाग म्हणून आपल्यापर्यंत आली, असं मानलं; तर त्यातच एक भाग म्हणून कोलटकरांनी लिहिलेल्या कविता आपल्यापर्यंत आल्या. (किंवा नेमाड्यांचं वरचं भाषणपण. आणि इतरही अनेक देशी-परदेशी संदर्भ). त्यात मग गेल्या वर्षी आपण 'दरवर्षीचा आठ जून, किम व कोलटकर' अशी नोंद केलेली. (आणि नेमाड्यांबद्दलही काही नोंदी आपण केलेल्या आहेत). व्हिएतनाम युद्धादरम्यान झालेली नापाम बॉम्बफेक, त्यात जीव घेऊन धावणारी किम- यांच्याबद्दलची 'महामार्गावरील नग्निका' अशी कविता कोलटकरांनी केलेली. तिच्याबद्दलची गेल्या वर्षीची नोंद होती. ती कविता, तिची मांडणी चांगली वाटली म्हणून ती नोंद होती. म्हणजे ती मनुकं रुचलेली, टिकाऊ वाटलेली. आता ही 'परंपरा' सांगणारी कविता, म्हणजे त्यातली मनुकंही खाल्ली गेली, पण ती रुचली नाहीत, म्हणून नोंद केली. परंपरेच्या बऱ्या-वाईट नोंदी अशा जमतील त्या कुवतीनुसार दोन्ही बाजूंनी किंवा त्यापेक्षाही जास्त बाजूंनी करत राहण्यापलीकडं काय करणार. हेही एक सफाईकामच स्वतःपुरतं.
प्रसिद्ध छायाचित्रकार सुधारक ओलवे यांचं 'न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात - सफाई कामगारांची सांगितली न गेलेली कथा' अशा शीर्षकाचं एक पुस्तक पूर्वीच प्रकाशित झालेलं आहे. वरचं छायाचित्र त्यातलंच आहे. या पुस्तकातली छायाचित्रं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेतली आहेत, पण कथा तीच.
अरुण कोलटकरांची 'परंपरा' ही कविता (पान ५३-७४) 'अरुण कोलटकरच्या चार कविता' (प्रास प्रकाशन) या पुस्तकात आहे. ही कविता 'सोपी' असली असती तर गोष्ट वेगळी, पण ती 'सोप्पी' आहे, असं वाचक म्हणून बनलेलं मत फक्त आपण इथं नोंदवतो आहोत. ती सोप्पी का वाटते, तर-
या कवितेची सुरुवात आहे:
प्रास प्रकाशन, मे २००६ । मुखपृष्ठ- वृंदावन दंडवते |
आई आहे आपली
सर्वांचीच
कबूलाय
तिच्या पोटातच आपण वाढलो
मानतो मी
पण बाहेर आलो
की नाळ तोडावीच लागते
की नाही?
जन्मभर ती
कमरेला गुंडाळून
हिंडायला तर येत नाही?
परंपरा
आई आहे आपली
सर्वांचीच
तिचंच दूध आपण प्यालो
आनंदानं
आणि बिनतक्रार
त्यात डीडीटीचं
आणि डायॉक्सिनचं प्रमाण
कमीजास्ती असलं
तरी गोड मानून घेतलं आपण
जन्मभर ते दूध
पुरणार नाही
असं वाटलवंतं कुणाला?
(पान ५५-५६)
आई हे परंपरेचं रूपक म्हणून वापरलंय. पण परंपरेचं प्रकरण इतकं सोपं वाटत नाही. आईची जन्मतारीख नि मरणाची तारीख कागदोपत्री कळू शकते. आई नावाची कायतरी शरीर असलेली गोष्ट दिसते, तसे आपण परंपरेतून बाहेर येतो, असं वाटत नाही. आई हे रूपक परंपरेसाठी अगदीच तोकडं आहे. म्हणून पुढं जाऊन तर कोलटकरांना कवितेत परंपरेच्या 'डेथ सर्टिफिकेट'चीही गोष्ट करणं सोपं झालेलं आहे:
पण परंपरेच्या बाबतीत
ती मेली
की नुसतीच कोमात आहे
आणि कोमात असेल
तर ती कोमातच राहणार अशी
कायमची
की त्यातनं बाहेर पडायची
शक्यता आहे
हे मोठ्यामोठ्या तज्ज्ञांनाही
सांगता येत नाही
तिला डेथ सर्टिफिकेट द्यायलाही चट्कन
तयार होत नाही कुणी
(पान ६५)
परंपरा कधी सुरू होते नि कधी संपते याचं सर्टिफिकेट सोडा, पण त्याची निश्चित तारीख तरी सांगता येते का?दोन
चार जून २०१६ रोजीच्या 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'च्या अंकात 'सरकारसाठी मैलासफाई' (स्कॅव्हेंजिंग फॉर द स्टेट) असा एक लेख आलेला आहे. अनघा इंगोले यांनी लिहिलेल्या या लेखासाठीच्या संशोधनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील (बार्टी) संशोधकांचा सहभाग राहिल्याचं तिथं नोंदवलेलं आहे. पुणे महानगरपालिकेतील (नाला सफाई व शौचालय सफाई करणाऱ्या) १०९१ कामगारांचं सर्वेक्षण आणि प्रत्येक कामगाराची वैयक्तिक मुलाखत घेऊन हा अभ्यास करण्यात आल्याचं म्हटलंय.
परंपरागतरित्या हाती सफाईकामामध्ये गुंतलेल्या कुटुंबांमधूनच आपण आल्याचं या सर्वेक्षणामधील बहुतांश कामगारांनी सांगितलं, असं लेखात नोंदवलंय:
"वारसाहक्कासारखी ही एक संस्थात्मक व्यवस्थाच आहे, आणि चतुर्थ श्रेणीतील कामगार त्याचा वापर करू शकतात. एखादा कर्मचारी निवृत्त झाला वा त्याला इजा होऊन तो काम करू शकणार नसेल तर आपल्या जागी आपलं पाल्य किंवा जवळच्या नातेवाईकाची नियुक्ती करवून घेणं या व्यवस्थेद्वारे शक्य होतं. दुसरी व्यक्ती शिक्षित असेल तर तिला मुकादम, शिपाई किंवा कारकून अशा एखाद्या वरच्या पदावर नियुक्त करण्याची तरतूद असली, तरी वास्तवामध्ये या कामगारांच्या बहुतेक मुलांना त्यांच्या पालकांचंच काम पुढं सुरू ठेवावं लागतं."शिवाय, 'महानगरपालिकेसोबत काम करणारे बहुतांश शौचालय सफाई कामगार व नाला सफाई कामगार हे अनुसूचीत जातींमधील- विशेषतः वाल्मिकी, मेहतर व भंगी जातींमधील आहेत. हाती सफाईकामासाठी याच जातीतील लोकांना रोजगार देण्याचं सरकारनंही सुरू ठेवलेलं आहे', हेही या सफाईकामाच्या परंपरेसंदर्भात वाचता येईल. (जाड ठसे ही रेघेची भर).
परंपरा म्हणजे काय? तिची डेथ कधी होते? तिची डेथ झालेला असा एक काळाचा ठिपका सांगता येतो का? वरच्या लेखात वाल्मिकी जातीतल्या राजेश संतू या ३६ वर्षीय सफाई कामगाराचं एक उदाहरण दिलंय, त्यांना त्यांच्या भागातल्या 'सुलभ शौचालय'वर देखरेखीचं काम मिळालं. या कामासोबत त्याच शौचालयाच्या वरती राहायला जागाही मिळाली. यातून त्यांचं जगणं सुकर झालं की कसं? त्यांच्या घरात येणारा वास आणि या कामामुळं त्यांनी गमावलेलं सार्वजनिक जीवन, यांचं काय करायचं? शौचालय आणि राजेश यांचं घर यांच्यातला फरक रात्रीच्या वेळी कोणा दारुड्यांना ओळखता येत नाही, मग संतूंच्या घरात मधेच कोणीतरी लडबडत येतं, याचं काय करायचं? आणि जातिव्यवस्था हा एक आपल्याकडच्या परंपरेचा भाग आहे, असं मानलं; तर त्यातल्या विशिष्ट जातींनाच या सफाईकामात का गुंतावं लागतंय, हा मुद्दा निव्वळ परंपरेला आईचं रूपक जोडून समजेल का?
शिवाय जातिव्यवस्था हा एकच भाग झाला. अख्ख्या परंपरेचा एक भाग. पण परंपरेसोबत भाषाही आली, आपल्या जन्मापूर्वीपासून अनेकानेकांच्या सोबतीनं नांदलेली. त्यातच कोलटकरांनी कविता लिहिली. जातिव्यवस्थेचं तरी थोडं स्पष्टपणे सांगता येईल, पण भाषाव्यवस्थेच्या बाबतीत आईचं रूपक कितीसं पुरं पडेल? कोलटकरांनी लिहिलेली ही 'परंपरा' कविता नक्की कुठल्या काळात लिहिली माहीत नाही, पण त्यांच्याच आसपास लिहू लागलेले भालचंद्र नेमाडे 'परंपरा' या गोष्टीबद्दल जे बोलतात, त्याचा संदर्भ या कवितेसोबत आपल्याला नोंदवायला हवा. नेमाडे अनेकदा 'परंपरा' या गोष्टीचं वेगळं सोप्पं रूप उभं करतात:
"व्यक्ती जन्मते तेव्हा ज्ञान घेऊन जन्मत नाही, ती फक्त शारीरिक जन्म घेते. पण ज्ञान अनेक पिढ्यांचं संकलित झालेलं संचित असतं. चोरी करू नये, कुणाचा खिसा कापू नये, या स्वरूपाचंही ज्ञान त्यात असतं. या परंपरेला नाकारण्यात अर्थ नसतो, त्यात फार प्रश्न विचारू नयेत, कारण त्यामागचे हेतू आपल्याला माहीत नसतात, ते वर्षानुवर्षांच्या ज्ञानातून चालत आलेले असतात. टी. एस. इलियटचंही एक उदाहरण या संदर्भात देता येईल. त्या काळात इंग्लंडमधे कंडोम वापरण्याचं शिक्षण मुलांना द्यावं किंवा नाही यावर वाद सुरू होता. त्यासंबंधी इलियटला विचारलं, तर तो म्हणाला, ‘असं शिक्षण अजिबात देऊ नये. कारण मुलांना हे कळलं पाहिजे की, आपली बायको सोडून दुसरीकडे जाणं बरोबर नाही. आपल्या परंपरेतच ते आहे. कंडोम वापरण्याचं शिक्षण देऊन गुप्तरोग काही कमी होणार नाही, फक्त कंडोमनिर्मितीचे कारखाने मात्र चालतील.’ असा इलियटसारखा मोठा कवीसुद्धा परंपरा मानणाराच होता."
(२०१३ साली युनिक फीचर्सनं आयोजित केलेल्या तिसऱ्या ई-संमेलनातल्या भाषणातून).
कोलटकरांची कविता आहे. नेमाड्यांचं भाषण आहे. यात फरक पडतोच. शिवाय नेमाडे परंपरेबद्दल अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी काही बरं-वाईट बोललेले आहेत (वरच्या भाषणात एका ठिकाणी, 'परंपरा आणि आधुनिकता दोन्ही एकाच वेळी पुढे जात असतात' असं आलंय). पण हे अर्थातच बरचंसं सोपेकरण आहे. कोलटकरांची कविता नुसतीच सोप्पी आहे, नेमाड्यांच्या कादंबरीबाहेरच्या गद्य मांडणीत परंपरेबद्दल जे येतं त्यात तर भीषण विरोधाभाससुद्धा आहेत. 'परंपरेला नाकारण्यात अर्थ नसतो, त्यात फार प्रश्न विचारू नयेत, कारण त्यामागचे हेतू आपल्याला माहीत नसतात, ते वर्षानुवर्षांच्या ज्ञानातून चालत आलेले असतात'- हे तर आणखीच भयंकर. राजेश संतूंच्या घरात जाऊन हे वाक्य बोलल्यावर कसं वाटेल? तर या दोन लेखकांना इथंच थांबवून आपण नोंदीच्या तिसऱ्या भागात जाऊ.
तीन
'जनुकं' हे परंपरेचं एक रूपक म्हणून वापरता येईल का? आपल्या स्वभावावर, रोजच्या वागण्यावर, आपल्या असण्यावर जनुकांचं मोठंच 'नियंत्रण' असतं, असं विज्ञानातले लोक सांगतात. शिवाय ही जनुकं फक्त आईकडून नव्हे तर बापाकडूनही येतात. खरंतर त्याच्याही आधीपासून कुणाकुणाकडून. त्यातही आई-बापात झोपलेली काही जनुकं आपल्या शरीरात जागी असू शकतात; किंवा त्यांच्यात जागी असलेली काही जनुकं आपल्यात झोपून जाऊ शकतात. दोन्हीकडून नक्की किती किती जनुकं आपल्यात आली याचा पत्ता नाही. सरमिसळ कितीतरी. त्यातही जाणीवपूर्वक हीच जनुकं पुढं टाकू नि थोडीशी राखून ठेवू, असा काही मामला (अजून तरी सरसकट) नाही. त्यात मग आई-बापांच्या दोन्ही बाजूंचा 'कूळवृत्तान्त' शोधलात तरी कळून कळून असं काय कळणार आहे? शिवाय 'आई' असं आपण ज्या व्यक्तीला म्हणतो ते शेवटी एक शरीर असतं. कोणाला समजा आपली आई-वडील यांची ओळखच नसेल, लहानपणीच काही घटनांमुळं एखादी व्यक्ती अनाथ झाली असेल, आणि नंतर तिला कोणी दत्तक घेतलं असेल, तर ती शारीरिक जन्मदात्यांपेक्षा वेगळ्याच कोणाला तरी 'आई' म्हणेल. असा हा शब्दाचा म्हणजे परंपरेचा गुंता खोलवर जाईल. परंपरेची गुंतागुंत ही अशी जनुकांसारखी असते असं वाटतं. त्यामुळं तिचं डेथ सर्टिफिकेट ही गोष्ट बोलायला सोपी आहे, पण प्रत्यक्षात आपल्या स्वतःच्या डेथपर्यंत लांबणारा हा मुद्दा आहे असं वाटतं.
रिचर्ड डॉकिन्स यांच्या 'द सेल्फिश जीन' (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, २००९) या पुस्तकात 'मीम्स' अशी एक संकल्पना वापरलेय (पान १८९-२०१). हे एक प्रकारचे सांस्कृतिक घटक मानलेत डॉकिन्सनी. ते शरीरात नसतील, पण इकडून तिकडून भाषेतून वगैरे ते असे पाझरत जातात. या पुस्तकापलीकडं या विषयाचा फारसा अदमास रेघेला नाही. पण 'मीम्स'चा मुद्दा जादा ताणणं विज्ञानाच्या काटेकोरपणात बसणारं नाही, असं काही लोक म्हणतात असं थोडंसं वाचनात येतं. पण 'कविकल्पना' म्हणून हे इंटरेस्टिंग वाटतं. 'मीम्स'ला मराठीत काय म्हणायचं? 'मनुकं' कसं वाटतं? म्हणजे बाहेरून खायची गोष्ट आणि मनाशी संबंधित असलेली, असे अर्थ त्यात येऊ शकतील.
म्हणजे मराठी भाषा ही एक परंपरा किंवा परंपरेचा भाग म्हणून आपल्यापर्यंत आली, असं मानलं; तर त्यातच एक भाग म्हणून कोलटकरांनी लिहिलेल्या कविता आपल्यापर्यंत आल्या. (किंवा नेमाड्यांचं वरचं भाषणपण. आणि इतरही अनेक देशी-परदेशी संदर्भ). त्यात मग गेल्या वर्षी आपण 'दरवर्षीचा आठ जून, किम व कोलटकर' अशी नोंद केलेली. (आणि नेमाड्यांबद्दलही काही नोंदी आपण केलेल्या आहेत). व्हिएतनाम युद्धादरम्यान झालेली नापाम बॉम्बफेक, त्यात जीव घेऊन धावणारी किम- यांच्याबद्दलची 'महामार्गावरील नग्निका' अशी कविता कोलटकरांनी केलेली. तिच्याबद्दलची गेल्या वर्षीची नोंद होती. ती कविता, तिची मांडणी चांगली वाटली म्हणून ती नोंद होती. म्हणजे ती मनुकं रुचलेली, टिकाऊ वाटलेली. आता ही 'परंपरा' सांगणारी कविता, म्हणजे त्यातली मनुकंही खाल्ली गेली, पण ती रुचली नाहीत, म्हणून नोंद केली. परंपरेच्या बऱ्या-वाईट नोंदी अशा जमतील त्या कुवतीनुसार दोन्ही बाजूंनी किंवा त्यापेक्षाही जास्त बाजूंनी करत राहण्यापलीकडं काय करणार. हेही एक सफाईकामच स्वतःपुरतं.
०००
सुधारक ओलवे यांनी काढलेलं छायाचित्र / मुंबई |