Friday, 21 December 2012

-

कागद होते, पेन होतं आणि शब्द होते. आणि एक झिरो होता. हिरो नव्हे. झिरो झिरो. झिरो हे त्याचं टोपणनाव. मूळ नाव शून्य. तर शून्याला लिहायचंय.
शून्य का लिहितो?
शून्याला त्याला हवे ते शब्द वापरता येत नाहीत, तरी?
शून्याला जे लिहायचंय ते कोणाला वाचायचं नाहीये, तरी?
शून्याला जी भाषा येते ती ढोंगी लोकांच्या ताब्यात आहे, तरी?
शून्याच्या भाषेला उडवणाऱ्या ढोग्यांना तो थांबवू शकत नाही, तरी?
तरी तरी तरी तरी शून्य का लिहितो.
शून्याला बहुतेक माहितेय की तो शून्य आहे. म्हणजे झिरो. हिरो नव्हे, झिरो झिरो.
म्हणून मग, तो पेनाने कागदावर लिहितो, त्याच्या डोक्यात येणारे शब्द.


फोटो : रेघ


***
काय गा म्यां पामराने
खरडावी बाराखडी;
आणि बोलावीं उत्तरें
टिनपट वा चोमडी
- बा. सी. मर्ढेकर
***

वाचेच्या चापल्ये     बहु जालो कुशळ।
नाही बीजमूळ     हाता आले।।

म्हणोनि पंढरिराया     दुःखी होते मन।
अंतरीचे कोण     जाणे माझे।।

पूज्य जालो अंगा     आला अभिमान।
पुढील कारण     खोळंबले।।

तुका म्हणे खूण     न कळे चि निरूती
सापडलो हाती     अहंकाराचे।।
- तुकाराम
***

2 comments:

  1. all three are good...नाही बीजमूळ हाता आले...That was never in doubt with me...There never was such ambition...but I what I can do is ..."आणि बोलावीं उत्तरें...टिनपट वा चोमडी"...oh, yes..tinpot...but instead of "तो पेनाने कागदावर लिहितो, त्याच्या डोक्यात येणारे शब्द", I have blogger...poor Google...ती झेलतीय मला मुकाट...

    ReplyDelete
  2. >>> शून्याला त्याला हवे ते शब्द वापरता येत नाही, तरी?
    --- एका अर्थी, हे अपरिहार्यच.
    Human language is like a cracked kettle on which we beat out tunes for bears to dance to, when all the time we are longing to move the stars to pity. -- Flaubert.

    ReplyDelete

डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ट अथवा नेट बँकिंगद्वारे रेघेची 'ऐच्छिक वर्गणी' भरायची असल्यास इथे क्लिक करावं.