३१ मार्च म्हणजे आर्थिक वर्षाची अखेर. त्यामुळे पैशांसंबंधीचे ताळेबंद काल मांडले गेले असतील. आपण बिनपैशाचा ताळेबंद आज मांडणार आहोत, 'रेघे'चा. आज १ एप्रिल म्हणजे मूर्खांचा - वेड्यांचा दिवस. आणि आपण कालचं निमित्त साधू न शकल्यामुळे आजचंच निमित्त साधू शकतो.
'रेघे'चं छापील स्वरूपात काही करता येईल का, असा विचार होता. पण मराठीत असं छापील स्वरूपात 'रेघे'च्या हेतूने काही करू पाहणं म्हणजे अत्यंत करूण शेवट निश्चित असलेलं काम आहे याची जाणीव अनेकदा झाल्यामुळे केवळ इंटरनेटवरच 'रेघे'चा आत्तापर्यंतचा प्रवास सुरू राहिलेला आहे.
'रेघे'चं नाव 'रेघ' ठेवण्यामागे जी कथा होती ती अशी : (ही कथा मूळची २३ फेब्रुवारी २०१०ची आहे) :

अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे-
नेहमीप्रमाणेच काही विशेष काम नसलेले गोष्टीतले बादशाह अकबर आणि त्याचा प्रधानमंत्री बिरबल यमुना नदीच्या काठावर वाळूमध्ये फेरफटका मारत होते. मधेच वाळूत पडलेली एक काठी बादशाहाने उचलून घेतली आणि ती फिरवत फिरवत तो बिरबलाशी गप्पा छाटायला लागला.
असेच ते चालत होते तर बादशाहाच्या डोक्यात काहीतरी झालं आणि त्याने हातातल्या काठीने वाळूत एक रेघ काढली नि बिरबलाला म्हणाला, ''बिरबला, ही रेघ न खोडता छोटी करून दाखवू शकशील का? बोल आहे काही तुझ्या युक्तीवाल्या डोक्यात?"
नेहमीप्रमाणे बादशहाच्या बालिशपणाला मनातल्यामनात शिव्या घालत बिरबल विचार करायला लागला. अर्ध्या मिनिटातच त्याला आयडिया सुचली पण बादशाहाला स्वतःच्या प्रश्नाच्या काठिण्यपातळीबद्दल लगेच निराश करण्यापेक्षा तो उगीच विचार केल्यासारखं दाखवायला लागला. विचारात पडलेल्या बिरबलाकडे बादशाह विजयी मुद्रेने पाहत होता. चार-पाच मिनिटांनी बिरबलाने बादशाहाच्या हातातली काठी घेतली आणि त्या काठीने बादशाहाच्या रेघेच्या बाजूला समांतर, जास्त लांबीची दुसरी रेघ काढली. आता बिरबलाच्या रेघेपुढे बादशाहाची रेघ छोटी दिसू लागली होती. मग नेहमीप्रमाणे बादशाहाने बिरबलाच्या बुद्धिचातुर्याचं कौतुक केलं नि पुढील गोष्टींना मजकूर मिळावा यासाठी दोघंही पुढील गप्पा छाटायला लागले.
आता बादशाह कोण आहे ते ज्याने त्याने ठरवावं. त्यांच्याबद्दल अधिक लिहून वेळ आणि शब्द खर्च करण्यात अर्थ नाही. पण असे बादशाह सगळीकडे पसरलेले आहेत. जरा आजूबाजूला बघितलं तर दिसतात. आपण बिरबल नाही, एवढं मात्र नक्की. त्यामुळे कोणाची रेघ छोटी करण्यासाठी ही रेघ काढलेली नाही. पण बहुतेक बादशाह प्रचंड खोटारडे आहेत. त्याला तर काही करू शकत नाही, पण आपली एक रेघ मारू शकतो. म्हणून ही 'रेघ'.
न छापून आलेलं मुखपृष्ठ |
तर, कोणावर टीका करण्यात वेळ घालवायला नको, म्हणून मराठी साप्ताहिकं, पाक्षिकं, मासिकं, (वाङ्मयीन स्वप्रसिद्धीसाठी) अनियतकालिकांच्या पातळीवर जे अंक निघतात त्यावर आपण फार बोलूया नको. आणि त्यासाठी आवश्यक सर्वेक्षण किंवा असं काही आपल्या हाताशी नाही, त्यामुळे केवळ शेरेबाजी होण्याची शक्यता आहे. आणि बहुसंख्येने ज्या गोष्टी छापल्या जातात त्याला अगदीच चांगल्या अर्थाने तुरळक आणि अतिशय लहान का होईना अपवादही आहेत, याची नम्र जाणीव असल्यामुळे इथे कोणावर टीका करण्यात अर्थ नाही. 'रेघे'च्या एकूण असण्यातूनच काही निरीक्षणं नोंदवली जातील असा मजकूर आपण 'रेघे'वर प्रसिद्ध करायचा प्रयत्न करत असतो, त्यातून जे स्पष्ट होईल ते होवो.
'रेघे'च्या आत्तापर्यंतच्या प्रवासात झालेल्या काही बरं वाटणाऱ्या गोष्टी अशा :
१. काही लोकांनी इथे नोंदवलेल्या पुस्तकांविषयी उत्सुकता दाखवली. असं किमान पंधराएक वेळा झालं. आणि क्वचित एखादवेळा इथे नोंदवलेल्या एखाद्या दुर्मिळ पुस्तकाची झेरॉक्स प्रत कोणी मागून घेतली, असंही झालं.
२. 'रेघे'च्या वाचकांपैकी काही जण इतर वेळी कुठल्याही भाषेतलं 'मॅगझिन' स्वरूपातलं काहीही वाचत नाहीत, पण 'रेघ' ते वाचतात, असं कळलं. म्हणजे इथे प्रसिद्ध झालेलं दुर्गा भागवतांचं भाषण त्यांच्यापर्यंत अन्यथा पोचलं नसतं, पण 'रेघे'वरून पोचलं आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडून ते पूर्ण वाचलं गेलं. अशा एक-दोन प्रतिक्रिया मिळाल्या.
३. चांगल्यापैकी वाचन असलेली काही मंडळी, जी इतर वेळी हल्लीची मराठी नियतकालिकं वाचण्याच्या फंदात पडत नाहीत, ती 'रेघे'वर येतात आणि इथला मजकूर वाचतात, अशा काही प्रतिक्रिया आल्या. हे लोक 'रेघ' हे एक जर्नल / पत्र आहे, या दृष्टीने इथे येऊन वाचत असतील तर चांगलं आहे, असं वाटतं. इथे चांगलं वाचन असलेल्या मंडळींमधे कॉल सेंटरमधे काम करणाऱ्या तरुणापासून सॉफ्टवेअर कंपनीसदृश गोष्टींमधे काही वर्षं घालवलेल्या इंजिनीयर व्यक्तीपर्यंत किमान पाचेक लोक आपल्या समोर आहेत. आणि ते मैत्रीखातर नाही, तर तटस्थपणे 'रेघे'कडे वाचनासाठी वळतात असं त्यांनी सांगितलेलं आहे.
४. वर्तमानपत्रांमधे, टीव्ही चॅनलांमधे काम करणारे काही लोक 'रेघ' अधूनमधून वाचतात, अशा किमान दहा-एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आल्या.
५. 'रेघे'वरचेच प्रकल्प असलेले आठ ब्लॉगही इथल्या नोंदींच्या निमित्ताने अधूनमधून वाचकांकडून चाळले गेले. भाऊ पाध्ये, अशोक शहाणे, कमल देसाई, श्री. दा. पानवलकर, सदानंद रेगे, हमीद दलवाई, तुळसी परब, वसंत दत्तात्रेय गुर्जर - हे ते कात्रणवहीच्या स्वरूपातलं दस्तावेजीकरण असलेले आठ ब्लॉग. या शिवाय कात्रणवही जोडता येईल एवढा ऐवज आपल्याकडे उपलब्ध नसलेल्या काही मंडळींपैकी रघू दंडवते यांच्यावर आपण रेघेवर एक मोठी नोंद दस्तावेज स्वरूपात करून टाकली. शिवाय मनोहर ओक, प्रकाश जाधव यांच्यावर लहानशा अशा नोंदी करून झाल्या.
६. 'रेघे'वर आपण जाणूनबुजून काही मोठ्या (चार हजार - पाच हजार किंवा जास्त) शब्दसंख्येच्या नोंदीही प्रसिद्ध केल्या. आणि वाचकांनी त्या वाचल्या असाव्यात. एखादा मोठा लेख पूर्ण वाचल्यावरच देता येईल अशा प्रतिक्रिया संबंधित लेखांवर आल्या यावरून हे आपलं मोठ्या शब्दसंख्येचं 'रेघे'वरचं बरं चाललंय असं म्हणायला हरकत नाही. मुद्दाम वाढवलेले शब्द नाहीत, पण मुद्दाम शब्द कमी करणं टाळण्यातून या नोंदी आहेत तशा आहेत.
७. याशिवाय, नुकतीच घडलेली नवीन चांगली घटना म्हणजे 'झेड-नेट'वरचा काही मजकूर 'रेघे'साठी मराठीत अनुवादित करण्यासाठी परवानगी त्यांनी आपल्याला दिली. त्यावर स्वतंत्र नोंद केलेली आहेच.
दोनेक नकारात्मक मुद्देही नोंदवूया :
१. फेसबुकवर वैयक्तिक खातं नसलं तरी 'रेघे'चं खातं असावं, अशी सूचना बहुतेक वाचकांनी केल्यामुळे आपण 'रेघे'चं फेसबुकवरचं खातं सुरू ठेवलंय, पण त्याला फारसा प्रतिसाद नाही. एखाद्या व्यक्तीने इथल्या नोंदीची लिंक शेअर केल्यावर काही प्रतिसाद(?) मिळतो, त्याने 'रेघे'पर्यंत काही पोच मिळत नाही. म्हणजे त्या व्यक्तीच्या शेअरिंगने काही नवीन वाचक 'रेघे'ला जोडले जातील अशी आशा फोल ठरण्याचीच बहुतेक उदाहरणं आहेत. ('रेघ' ही व्यक्ती नसल्यामुळे हे होत असेल का?) पण तरीही वाचकाग्रहास्तव फेसबुकवरचं खातं सुरू आहे; ते बंद करावं, असा बारमाही विचार 'रेघे'वर वावरत असतोच.
यानिमित्ताने एक नाट्य(मय) छटा :
नैतिकता, समाजाभिमुखता, अभिरुचिसंपन्नता, देशप्रेम, स्त्री-पुरुष समानतेचं भान, ज्ञानसंपन्नता, इतर मानवांप्रति असलेली आत्यंतिक प्रेमभावना, कलासक्त वृत्ती, छायाचित्रणकौशल्य, संवेदनशीलता अशा व इतर अनेकविध गुणांचा समुच्चय फेसबुकच्या दैनंदिन समारंभामधे ठायीठायी दिसतो. -- 'पण मला रोज केळ्याची शिकरण आणि मटार उसळ खायला आवडत नाही'. -- म्हणजे काय? -- 'जाऊ द्या तुम्हाला नाही समजायचं'. -- तरी काहीतरी खाणं भाग आहे की नाही? -- 'द्या मग आता आहे ते'.
२. 'रेघ' हे पत्र असल्यामुळे त्यात काही लोकांनी लिहावं असे प्रयत्न सुरू होते. काहींनी स्वतःहून तयारी दाखवली होती, काहींना आपण विचारलं होतं. पण ते जवळपास ९९ टक्के फोल गेल्याचा अनुभव आहे. यात 'रेघ' चालवणाऱ्या व्यक्तीच्या संवादकौशल्याच्या कमतरतेवरच १०० टक्के दोषाचं खापर फोडूया आणि फार काही बोलायचं टाळूया. स्वतःवरच खापर फोडलेलं बरं, दुसऱ्यांना इजा नको. यामुळे एक मर्यादा अशी येते की, आपण 'एकटा जीव सदाशिव' अशा ताकदीवरच इथे नोंदी करू शकतो. कित्येक गोंगाटावरचे उतारे आपण देऊ शकत नाही, काही पुस्तकं माहिती असून अजून वाचनात आलेली नसतात त्यामुळे योग्य निमित्त येऊन जातं पण आपल्या कमतरतेमुळे त्यांची नोंद होऊ शकत नाही, कित्येक गोष्टी माहिती असल्या तरी वेळेच्या गणितात बसवता येत नाहीत. पण आपल्याला असलेली माहितीच द्यावी एवढंच केलं तरी ठीकच. आणि निमित्तं दर वर्षीच येत राहणार त्यामुळे कधीतरी काहीतरी होईलच. 'झेड-नेट'सोबतच्या सहकार्य योजनेमुळे यावर काही उपाय झाल्यासारखी परिस्थिती आहे, पण मुळातूनच 'रेघे'साठी कोणी लिहावं असे आपले प्रयत्न होते. ते आता आपण स्वतःहून कोणाला सांगायचं नाही असं ठरवून टाकलेलं आहे.
***
आपण सुरुवातीला काही निरीक्षण देणार नसल्याचं म्हटलं, तरी एक निरीक्षण नोंदवू. कोणत्याही नियतकालिक / अनियतकालिकाने मजकूर विकावा, हेतू विकू नये. कारण हेतू कायम चांगलाच असला तरी त्यातून चांगला मजकूर उभा राहातोच असं नाही. 'रेघे'वरचा मजकूर चांगला असतो किंवा नाही हे ती मारणाऱ्याच्या मर्यादेवरून ठरेल, पण आपण इथे कोणताही उदात्त हेतू विकत नाही, हेही काही कमी नाही.
'रेघे'वर आपण आपला जर्नल / पत्र चालवण्याचा हेतू फक्त स्पष्ट केलेला आहे. शिवाय, माध्यमं, गोंगाटावरचा उतारा, साहित्य, भाषा याच साधारण विभागांमधे इथे नोंदी प्रसिद्ध होतात, ही मर्यादाही स्पष्ट केली आहे. यापलीकडे आपण विकू मात्र काहीच शकलेलो नाही, त्यामुळे हा सगळा ताळेबंद स्वतःचा खिसा रिकामा करणारा ठरलेला आहे. कधीच टॅली न होणारी ही बॅलन्सशीट आहे. इंटरनेट, वीज यांच्यावरचा खर्च आणि शिवाय एका नोंदीवर स्वतंत्रपणे पुस्तक घ्यावं लागल्याचा खर्च आहे. वेळ आणि डोक्याचा भाग आपण यात धरत नाहीयोत.
ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी 'रेघे'वरच्या काही नोंदी एकत्र करून 'निवडक नोंदीं'ची एखादी पुस्तिका किंवा स्वतंत्र अंक असं काही खाजगी वितरणासाठी छापावं, असा विचार आहे. त्याला चारेक वाचकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पैसे देण्याचीही तयारी दाखवली आहे. पण दाखवलेली तयारी आणि प्रत्यक्षातली तयारी यात एवढा मोठा फरक 'रेघे'ने आत्तापर्यंत अनुभवलाय की, स्वतःचे पैसे घालून असलं काही करू नये एवढा (एकतरी) शहाणपणाचा विचार आपण कायम ठेवलेला आहे. तरी एक इथे नोंदवूया की, ज्यांना 'रेघे'वरच्या काही नोंदी छापील स्वरूपात असल्या तर अधिक गांभीर्याने त्यांच्याकडे पाहिलं जाईल, जे लोक अजून इंटरनेटवरच्या वाचनाला सरावलेले नाहीत त्यांच्यापर्यंत इथला मजकूर पोचेल, त्यातून तुरळक का होईना पण काही आर्थिक निधी उभा राहील, असं वाटत असेल त्यांनी ekregh@gmail.com इथे नुसती नावं देऊन ठेवलीत तरी चालेल. वीसेक नावं जमली की आपण निवडक नोंदींच्या पुस्तिकेची पानं निश्चित करू (साधारण ४०च्या आसपास) आणि खर्च काढू आणि त्याची विभागणी करू. या पुस्तिकेत 'झेड कम्युनिकेशन्स'वरचा मजकूरही छापण्याची परवानगी आहे. आणि इथे 'रेघे'च्या हेतूकडे बघून कोणी आपलं नाव नोंदवू नये तर मजकुराकडे बघून मनापासून वाटलं तरच नाव नोंदवावं. तसं नाही झालं तर, अशी नावं नाही जमली असं समजून आनंदी राहू.
शिवाय आत्ता आहे त्या स्वरूपात 'रेघ' असण्याचे काही फायदे आहेतच. जे लोक छापील गोष्टींकडे पाहतही नाहीत, ते इथे किमान मजकूर चाळतात, काही त्यातले वाचतातही. वितरणाची काहीच व्यवस्था नसल्याचा वेगळा तोटा या मार्गात होत नाही. जुना सगळा मजकूर एकत्र सापडतो. कुणाला इथलं काही दुसऱ्या कुणाला पाठवावं वाटलं, तर सहज पाठवता येतं. एकूण मिळून काही दस्तावेज तयार होतो. पण छापील गोष्टीशी शारीरिक स्पर्शामुळे जी जोडल्याची भावना असते ती इथे कमी असेल का? पण मग ती या चौकटीमधल्या रंगांमधून, भाषेच्या वापरामधून, चित्रांच्या मांडणीमधून भरून काढता येईल का? पाहू जमेल तसं.
लहान पत्रं, इंटरनेटवरची गप्पांपलीकडे जाऊ शकणारी व्यासपीठं, पुस्तिकारूपी अंक, पुस्तकं अशी माध्यमं सध्याच्या माध्यमांच्या बाजाराबाहेरून काढत राहाणं ही एक आवश्यक बाब आहे, या तथ्यावर विश्वास ठेवून 'रेघे'चा असा हा समांतर प्रवास सुरू आहे. हा पुरेसा नाही याचीही जाणीव ठेवूया.
एकूण आपल्या 'इम्बॅलन्स शीट'चा निष्कर्ष हा की, 'रेघ' हा एक मूर्खपणाचा / वेडेपणाचा व्यवहार आहे. त्यामुळे आपण या नोंदीच्या शीर्षकात कालच्या आर्थिक ताळेबंदाच्या दिवसाचा आणि आजच्या- मूर्खांच्या दिवसाचाही उल्लेख करून ठेवलेला आहे.
आता, आणखी एक गोष्ट सांगून थांबू :
रघुनाथ धोंडो कर्वे संततीनियमन, लैंगिक स्वातंत्र्य यासंबंधी बरंच काही सांगून गेले. ज्या महाराष्ट्रात ते होते तिथे त्यांनी 'समाजस्वास्थ्य' नावाचं मासिक २७ वर्षं चालवलं. आपलं म्हणणं मांडणं, त्याचा प्रसार, हाच उद्देश. कर्वे गेले आणि या मासिकाचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला. त्या अंकाचा मजकूर त्यांनी एकत्र करून ठेवला होता, बाकीची तयारी झाली होती, म्हणून तो अंक येऊ शकला. पण कर्व्यांचं निधन आणि 'समाजस्वास्थ्य'चं निधन हे एकत्रच झालं. 'रेघे'ची पोच कर्व्यांच्या आसपासही नाही हे खरं, शिवाय कर्व्यांची निष्ठा कमालीची होती म्हणून अखेरपर्यंत त्यांनी बाजू लढवली.
पण मराठीत हे आहे ते कारुण्य काय कमीये का? उगा आपण त्यात 'रेघे'ची छापील भर कशाला टाकायची?
***
यही दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यों हैं।
- कैफी आझमी

तुमच्या खास शैलीतली हि नोंद तशी बोचणारी आहे. 'रेघे'मुळे फायदा होणाऱ्यात मी ही एक. फायदा अनेक अर्थांनी आहे. नवी माहिती, नवी पुस्तकं, नवे ब्लॉग्स आणि नवे विचार 'रेघे'मुळे कळत गेलेत. आणि ही रेघ अशीच चालू राहावी अशी मनापासून इच्छा आणि एक वाचक म्हणून मागणी. केवळ पोकळ बोलघेवडेपणा नको हे ही मान्य.
ReplyDeleteHmmm... Real explainations and reasons...
ReplyDelete'रेघ'ची माझी ओळख तशी अलिकडची. आंतरजालावर मराठी वाचायचा कंटाळा आल्यावर (का? ते विचारू नका - त्यावर न बोलणं इष्ट!!) तुम्ही सापडलात. इथलं लेखन विचारांत पाडतं, अस्वस्थ करतं - म्हणून मला ते आवडतं. गंभीर आहे थोडं - पण त्याचीही गरज असतेच - ती इथं पुरवली जाते.
ReplyDeleteरेघ पुढे चालू राहील अशी आशा. त्यासाठी आर्थिक सहभागाची तयारी आहे.