'प्रॉपगॅन्डा' या संकल्पनेविषयी आपण 'रेघे'वर मागे काही नोंदी केलेल्या आहेत. एडवर्ड बर्नेसच्या 'प्रॉपगॅन्डा' ह्या पुस्तकाबद्दलही एक नोंद आपण केलेली आहे. आज परत तोच विषय आलाय त्याचं कारण जरा लांबचं आहे. द ब्रिटीश लायब्ररी, ९६ यूस्टन रोड, लंडन... या पत्त्यावर गेल्या शुक्रवारी एक प्रदर्शन सुरू झालंय, त्याचं नाव आहे - 'प्रॉपगॅन्डा: पॉवर अँड पर्स्युएजन'. या प्रदर्शनाच्या निमित्ताने, त्या प्रदर्शनातल्या चारेक चित्रांसकट ही लहानशी नोंद 'रेघे'वर करून ठेवूया.
या प्रदर्शनाबद्दल 'अल-जझीरा'वर आलेल्या लेखात म्हटलंय की, पुरातन काळातल्या ग्रीक सम्राटांची चित्रं कोरलेल्या नाण्यांपासून सध्याच्या सोशल मीडियाच्या काळापर्यंत अनेक पातळ्यांवरचा, सत्ताधाऱ्यांकडून केला जाणारा प्रॉपगॅन्डा या प्रदर्शनात पाहायला मिळतो. अर्थात या संकल्पनेचा केवळ नकारात्मक भाव दाखवणाऱ्याच नव्हे तर सकारात्मक भाव दाखवणाऱ्या वस्तूही या प्रदर्शनात आहेत.
त्यामुळे स्वतःचं शौर्य युद्धभूमीतून रक्तबंबाळपणे दिसेल ते दिसेल, पण हे शौर्य सुंदर पण आहे असं कसं दाखवता येईल, या विचारातून नेपोलियनने काढून घेतलेलं चित्र या प्रदर्शनात आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याबरोबरच आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या अलीकडच्या काळातल्या काही जाहिरात मोहिमांमधली चित्रंही या प्रदर्शनात आहेत. प्रॉपगॅन्डाविषयक काही विधानांची चित्ररूपंही या प्रदर्शनात आहेत. चित्रांशिवाय या प्रदर्शनात व्हिडियोही आहेत, अशी माहिती आपल्याला 'अल-जझीरा'वरच्या लेखातून मिळते.
या प्रदर्शनातली तीन उदाहरणं पाहू.
एक- २००३मध्ये इराकवर अमेरिकेने लादलेल्या युद्धात अमेरिकी सैनिकांना फावल्या वेळात खेळण्यासाठी सद्दाम हुसेन व त्यांच्या सहकाऱ्यांची चित्रं छापलेले पत्ते देण्यात आले होते, हे पत्तेही या प्रदर्शनात आहेत; ही चित्रं पत्त्यांवर छापण्याचा हेतू हा की आपल्या शत्रूंचे चेहरे सतत दृष्टीच्या पट्ट्यात राहावेत. हे पत्ते असे :

दोन- पहिल्यांदा पहिल्या महायुद्धावेळी, मग तेव्हा दिसलेल्या यशामुळे दुसऱ्या महायुद्धावेळी नि अशा दोन महायशांमुळे व्हिएतनामच्या युद्धावेळी आणि नंतरही काही वेळी वापरण्यात आलेलं 'अंकल सॅम'चं पोस्टरही प्रदर्शनात आहे. सैन्यातल्या भरतीसाठी अमेरिकी नागरिकांना आवाहन करणारं हे पोस्टर तसं आता बरंच प्रसिद्ध झालंय. आणि केवळ युद्धखोरीपलीकडे जाऊन एकूण अमेरिकेच्या विविध पातळ्यांवरच्या जागतिक दादागिरीचं नि प्रभावाचं प्रतीक बनलंय :
तीन- आता दुसऱ्या एका सत्ताधीशाकडे वळू. माओ त्से-तुंग. चीनमध्ये आधी सत्ता काबीज केल्यानंतर १९६६ साली माओ साहेब 'सांस्कृतिक क्रांती' घडवायला निघाले. तेव्हा, म्हणजे त्यांचं वय ७४ वर्षं होतं तेव्हा, रंगवण्यात आलेलं एक पोस्टर या प्रदर्शनात पाहायला मिळेल. १९२२ साली अन्युआन इथे खाणमजुरांच्या संपाचं नेतृत्त्व करून क्रांतीची ज्योत माओ यांनी एकहाती पेटवली, असं सांगणारं तरूण माओंचं हे चित्र. सांस्कृतिक क्रांतीच्या काळात हे चित्र अफाट गाजलं :
हे झाले राजकीय सत्ताधारी लोक आणि त्यांनी विविध साधनं वापरून आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, त्यांच्यावर लादण्यासाठी, त्यांना भुलवण्यासाठी केलेल्या युक्त्या. या सगळ्यात माध्यमांची भूमिका फारच महत्त्वाची. किंबहुना वृत्तमाध्यमं म्हणजे पत्रकारिता असते की प्रॉपगॅन्डा असतो, हे कसं ओळखायचं हा आत्ताच्या काळातल्या गोंधळातला एक महत्त्वाचा मुद्दा.
'अल-जझीरा'वरच्या ज्या लेखाचा संदर्भ आपण दिलाय, त्यात जॉन पिल्जर यांचं एक विधान दिलंय : ''आता आपण बातम्या लावल्या आणि त्यांचे स्त्रोत पाहिले, तर आपल्याला असं लक्षात येतं की सरकारकडून, हितसंबंध गुंतलेल्यांकडून आणि महत्त्वाच्या नि अधिकारी पदावरच्या व्यक्तींकडून जे सांगितलं जातं ते वरवरती दिसतं तसंच (पत्रकारांनी) घेतलेलं असतं. मी ज्याला आधुनिक सूक्ष्म प्रॉपगॅन्डा असं म्हणेन त्याचा मुख्य स्त्रोत (वृत्तमाध्यमं) हा आहे.'' ['रेघे'वर यापूर्वी पिल्जर येऊन गेलेले आहेत].
पिल्जर ज्या सूक्ष्म प्रॉपगॅन्ड्याबद्दल बोलतायंत, त्यात आणि आपण वरती जी चित्रं पाहिली त्यातल्या प्रॉपगॅन्ड्यामध्ये काहीसा फरक आहे. म्हणजे सरकारी जाहिराती या सरळच काही सांगू पाहत असतात आणि ते तुलनेने स्पष्ट असतं. पण आपण ज्या गोष्टी बातम्या म्हणून वाचायला जातो, त्या गोष्टी प्रॉपगॅन्डा म्हणून कोणी हितसंबंधांसाठी, आर्थिक संबंधांसाठी पेरलेली माहितीच असेल तर काय करायचं?
हे एकूण माध्यमांबद्दलचं किंवा पत्रकारितेचंही समजा बाजूला ठेवलं, तरी स्वतःकडेच पाहिल्यावर काय दिसतं? फेसबुकवर झुकेरबर्ग आणि कंपनीने दिलेल्या फुकटच्या सल्ल्याला फशी पडून आपण कशाकशाला 'लाइक' करतो आणि मुळात आपल्याला हा सल्ला कशाला देतात हे लोक, असा काही विचार केला तर मग असं दिसतं की, आपण सगळेच ह्या प्रॉपगॅन्ड्यात सामील आहोत. आपण आपली खाजगी माहिती एका खाजगी कंपनीला देतो, ती माहिती आणखी हितसंबंध असलेल्यांना पुरवली जाते आणि मग आपल्यापर्यंत पोचतो प्रॉपगॅन्डा.
याशिवाय अनेक प्रकार सांगता येतीलच. आपण नाही का, आपल्या नैतिकतेचा नि अभिरुचीसंपन्नतेचा नि मानवतेचा नि अजून कशाकशा वृत्तीचा प्रॉपगॅन्डा करत सोशल मीडियावर! त्यासाठी असतातच तयार पुरवलेली चिन्हं. तर हे सगळं असं आहे. म्हणजे कसं, ते अमेरिकी राज्यशास्त्रज्ञ हेरॉल्ड लासवेलनी ऑगस्ट १९२७ सालच्या त्यांच्या 'द थिअरी ऑफ पॉलिटिकल प्रॉपगॅन्डा' या नावाच्या पाच पानी लेखातही सांगितलेलं आहे. या लेखात लासवेल यांनी केलेली प्रॉपगॅन्ड्याची व्याख्या अशी : प्रभावी चिन्हांचा (सहेतूक) वापर करून सामूहिक वृत्तीचं व्यवस्थापन म्हणजे 'प्रॉपगॅन्डा'. या विधानाचंही एक ग्राफिक स्वरूपाचं काही चित्र आपण बोलतोय त्या प्रदर्शनात आहे. त्यात लासवेल यांच्या मूळ लेखानुसार विधान थोडं वाढवून घेतलेलं असावं. [लासवेल यांचाही संदर्भ 'रेघे'वर यापूर्वी नोम चोम्स्कींच्या लेखात येऊन गेलाय]. तर, लासवेल यांचं हे विधान दुकानांमधल्या काचेच्या कपाटांमध्ये उभ्या असतात तसल्या माणसांच्या पुतळ्यावरती दिलेलं दिसतंय. कदाचित 'व्यक्ती'भोवती फिरणाऱ्या माध्यम व्यवहारामुळे ते तसं केलं असण्याची शक्यता आहे :

फोटो : क्रिएटिव्ह रिव्ह्यू |
तर असं हे प्रॉपगॅन्ड्याबद्दलचा प्रॉपगॅन्डा करणारं प्रदर्शन नि त्याचा प्रॉपगॅन्डा करणारी ही नोंद. सतरा सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे. ज्यांना शक्य असेल त्यांना जाऊन येता येईल. अठरा वर्षांवरच्या व्यक्तीसाठी प्रवेश शुल्क आहे नऊ पौंड. आणि त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना मोफत प्रवेश.
***
लटिके हासे लटिके रडे। लटिके उडे लटिक्यापे।।
लटिके माझे लटिके तुझे। लटिके ओझे लटिक्याचे।।
लटिके गाये लटिके ध्याये। लटिके जाये लटिक्याचे।।
लटिका भोगी लटिका त्यागी। लटिका जोगी जग माया।।
लटिका तुका लटिक्या भावे। लटिका बोले लटिक्यांसवे।।
- तुकाराम

I find the most interesting example of propaganda in Hitler youth (Hitlerjugend).
ReplyDelete"Determining that by age ten children's minds could be turned from play to politics, the regime inducted nearly all German juveniles between the ages of ten and eighteen into its state-run organization. The result was a potent tool for bending young minds and hearts to the will of Adolf Hitler.
Baldur von Schirach headed a strict chain of command whose goal was to shift the adolescents' sense of obedience from home and school to the racially defined Volk and the Third Reich. Luring boys and girls into Hitler Youth ranks by offering them status, uniforms, and weekend hikes, the Nazis turned campgrounds into premilitary training sites, air guns into machine guns, sing-alongs into marching drills, instruction into indoctrination, and children into Nazis. A few resisted for personal or political reasons, but the overwhelming majority enlisted."
A blogger says: What drew German teens by the millions to the Hitler Youth? The uniforms, the camaraderie, the cultish adoration of Der Fuhrer -- and lots of Aryan sex