हेन्री डेव्हिड थोरो |
मागच्या नोंदीत आपण 'लॅफम्स क्वार्टर्ली'ची ओळख नोंदवून ठेवली. या त्रैमासिकाने 'निसर्ग' ह्या विषयाला वाहिलेला जो अंक काढला होता, त्यात हेन्री डेव्हिड थोरो (१२ जुलै १८१७ - ६ मे १८६२) याच्या 'वॉल्डन'मधला एक मजकूर छापला होता. मागच्या नोंदीतल्या म्हणण्याला जोड म्हणून आणि थोरो गेला त्याच्यानंतरच्या एकशेएकावन्नाव्या वर्षी त्याची आठवण काढावी म्हणून 'लॅफम्स क्वार्टर्ली'मधे आलेल्या त्या मजकुराचं रूपांतर थोरोच्या परवानगी करून नोंदवतो आहे. काही चुकलं असेल तर थोरो आपल्याला माफ करेल अशी आशा.
१८४५ साली वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी थोरो अमेरिकेतल्या कॉन्कर्ड इथल्या आपल्या घरापासून व कुटुंबापासून दूर वॉल्डन तळ्याकाठी स्वतःच्या हातांनी बांधलेल्या एका खोलीच्या घरात राहायला गेला. अन्न जमवण्यापासून सर्व कामं करून त्याने त्या जागेत दोनेक वर्षं काढली. या काळातल्या आपल्या अनुभवांवर त्याने लिहिलेलं 'वॉल्डन' हे पुस्तक. त्यातला हा मजकूर आहे.
***
मुंग्यांचं महाभारत
- हेन्री डेव्हिड थोरो
एके दिवशी बाहेर पडून मी घराशेजारीच रचून ठेवलेल्या लाकडांजवळ गेलो. जाळ म्हणून वापरण्यासाठी जमवून ठेवलेली ती लाकडं म्हणजे तशी झाडांची खोडंच होती. तिथे मला दोन मोठ्या मुंग्या दिसल्या. एक लाल रंगाची होती, तर दुसरी जरा मोठी - जवळपास अर्धा इंच लांबीची, काळ्या रंगाची मुंगी होती. त्या दोघीही एकमेकींशी लढत होत्या. एकदा दुसऱ्या मुंगीच्या वरचढ ठरता आलं की पहिली मुंगी दुसरीला सोडत नव्हती. अडखळत, धडपडत त्यांची लढाई सुरू होती. त्या लाकडांच्या थप्पीमधल्या कपच्यांवर त्या अविरतपणे घरंगळत होत्या, पडत होत्या. अजून जवळ जाऊन पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की त्या कपच्यांवर आणखीही मुंग्या होत्या. तिथे ह्या लढवय्या मुंग्या पाहून मला जरा आश्चर्य वाटलं. आणि ती साधीसुधी लढाई नव्हीत, तर मुंग्यांमधलं वांशिक युद्ध होतं. लाल मुंगी कायम काळीविरोधात चेतावल्यासारखी पुढे यायची आणि अनेकदा दोन लाल एका काळीविरोधात लढत असायच्या. लाकडाच्या त्या साठ्यातल्या टेकड्यांमध्ये आणि दऱ्यांमध्ये या झुंडीच्या झुंडी उभ्या होत्या. आणि जमिनीवर सगळीकडे लाल आणि काळ्या, दोन्ही बाजूंच्या मेलेल्या आणि मरत असलेल्या मुंग्या पसरलेल्या होत्या. मी प्रत्यक्ष पाहिलेली ती एकमेव लढाई होती आणि लढाई सुरू असताना मी जिथे प्रत्यक्ष वावरत होतो अशी ती एकमेव युद्धभूमी होती. कत्तलकारी युद्ध सुरू होतं. एका बाजूला लाल रिपब्लिकन होते आणि दुसरीकडे काळे साम्राज्यवादी होते. दोन्ही बाजूंनी प्राणघातक लढा सुरू होता, तरी मला कोणताही आवाज ऐकू येत नव्हता.
विशेष म्हणजे मानवी सैनिक कधीच एवढ्या निर्धाराने लढलेले नसावेत. त्या लाकडी कपच्यांमधल्या दरीत पडलेल्या सूर्यकिरणांमध्ये मला दुसरी एक मुंग्यांची जोडी एकमेकांविरोधात जुंपलेली दिसत होती. आता दुपारची वेळ होती आणि त्यांनी बहुधा सूर्य मावळेपर्यंत किंवा जीव मावळेपर्यंत लढत राहण्याचा निश्चय केलेला होता. एक लहानखुरी लाल योद्धा मुंगी एखाद्या अबलख घोड्याप्रमाणे तिच्या विरोधकांच्या आघाडीवर तुटून पडली होती. आणि युद्धभूमीवर अडखळत चाल करण्याच्या तिच्या या प्रयत्नांमध्ये एकही क्षण तिने पायाच्या टोकाजवळच्या एका विरोधकाला छळणं सोडलं नव्हतं नि एकाला आधीच यमसदनाला धाडलं होतं. नंतर मी आणखी जवळ जाऊन पाहिल्यावर दिसलं की, एका बलवान काळीने त्या लाल योद्धा मुंगीला आजूबाजूंनी धोपटत तिच्या समूहाच्या इतर सदस्यांपासून तोडलं होतं. बुलडॉग जातीच्या कुत्र्यांपेक्षाही सातत्य राखत त्या मुंग्यांमधला लढा सुरू होता. मागे सरण्याचं कोणतंही चिन्ह कोणीही दाखवत नव्हतं. त्यांची युद्धभूमीवरची घोषणा एकच होती : जिंकू किंवा मरू. या लाकडी कपच्यांमधल्या दरीजवळच्या एका टेकडीवर एक लाल मुंगी जबरदस्त उत्साहाने खदखदत आली. तिचा उत्साह असा होता की, एकतर तिने आत्ताच एखाद्या शत्रूचा खातमा केली असेल किंवा तिने अजून युद्धातच भाग घेतला नसेल. बहुधा यातली दुसरीच शक्यता खरी होती, कारण तिच्या शरीराचे सगळे अवयव शाबूत होते. तिला बहुधा तिच्या आईने एकतर 'ढालीसह परत ये किंवा ढालीवरून परत ये' असं सांगून युद्धभूमीवर धाडलं असावं. किंवा ती ग्रीक पुराणकथेतील अकिलीसच्या पात्रासारखी असेल, स्फोट होईपर्यंत दाबून ठेवलेल्या क्रोधासह आता ती सूड उगवायला किंवा पॅट्रोक्लसची सुटका करायला युद्धभूमीवर आलेय. टेकडीवर उभी राहून ती लांबून ह्या असमान ताकदींच्या युद्धाकडे पाहतेय - काळ्या मुंग्या लाल मुंग्यांच्या जवळपास दुपट्ट संख्येने युद्धभूमीवर मौजूद होत्या. ती लाल मुंगी वेगाने युद्धभूमीजवळ आली आणि योद्ध्यांपासून अर्ध्या इंचावर आल्यानंतर संधीचा शोध घेऊन तिने एका काळ्या योद्ध्यावर झडप घातली. पुढच्या अंगाच्या उजव्या पायाच्या टोकाने तिने आपलं युद्धकार्य सुरू केलं नि मग आपल्या इतर योद्धा सहकाऱ्यांना निवडीसाठी त्या शत्रूला सोडून दिलं. आता तिथे तीन मुंग्या (दोन लाल आणि एक काळी) जीवाच्या बचावासाठी एकत्र आल्या होत्या, जणू काही सगळ्या भिंती नि कडीकुलपं तोडणारं काही नवीन आकर्षण त्यांच्यात निर्माण झालं होतं.

युद्धाच्या या टप्प्यावर त्यांनी कुठल्यातरी संगीत चमूला आपापली राष्ट्रगीतं वाजवायला सांगून कमकुवत झालेल्या योद्ध्यांना उत्साहित करण्याचं आणि मरत आलेल्या योद्ध्यांना चेतावण्याचं काम सुरू केलंय, असं कळलं असतं तरीही आता मला काहीच आश्चर्य वाटलं असतं. मीही एकदम रोमांचित झालो होतो, जणू काही ती माणसंच आहेत. तुम्ही याबद्दल जितका विचार कराल तितका त्यांच्यातला फरक कमी असल्याचं जाणवतं. अर्थात, कॉन्कर्डच्याच नव्हे तर अमेरिकेच्याही इतिहासात नोंदवल्या गेलेल्या कुठल्याही लढ्यातील सहभागी लोकांची संख्या, त्यातील देशभक्ती व शौर्य यांची कणभरही तुलना माझ्यासमोर चाललेल्या या युद्धाशी होऊ शकली नसती. सहभागी योद्ध्यांची संख्या आणि जीवितहानीबद्दल बोलायचं तर हे युद्ध म्हणजे ऑस्टर्लित्झ किंवा ड्रेस्डनवरच्या युद्धांप्रमाणे (नेपोलियनने इतर युरोपीय प्रदेश काबीज करताना केलेली युद्धं) होतं. कॉन्कर्डमधलं युद्ध!(१) देशभक्तांच्या बाजूचे दोन जण हुतात्मा झाले, ल्युथर ब्लान्कार्ड जखमी झाला! इथे तर प्रत्येक मुंगी बट्रीकप्रमाणे होती - 'मारा गोळ्या! देवाच्या कृपेसाठी झाडा गोळ्या!' - आणि इथल्या शेकडो मुंग्या डेव्हीस आणि होस्मरचं नशीब घेऊन आल्या होत्या. यातलं कोणीही भाडोत्री नव्हतं. आपल्या पूर्वजांप्रमाणेच त्या मूल्यांसाठी झगडत होत्या, असा विश्वास मला वाटू लागला. चहावरचा तीन पेनींचा कर चुकवण्यासाठी कोणी लढत नव्हतं. या लढाईचा निकाल ज्यांच्यावर परिणाम करणार आहे त्यांच्यासाठी इतका महत्त्वाचा आणि स्मरणात राहणारा ठरणार होता, जितका बंकर हिलच्या लढाईचा(२) निकाल आपल्या स्मरणात राहिलाय.
मी ज्या तीन मुंग्यांचं विशेषकरून वर्णन केलं त्या ज्या लाकडाच्या कपच्यावर होत्या तो काप मी उचलला आणि माझ्या घरात घेऊन गेलो. माझ्या खिडकीच्या कठड्यावरच्या काचेच्या भांड्याखाली तो काप ठेवला. पहिल्या लाल मुंगीला भिंगातून पाहताना मला असं दिसलं की, ती आपल्या पुढच्या पायांनी शत्रूशी झुंजत होती, आणि तिच्या उरलेल्या पायांना जीवघेणी इजा झाली होती, तिची छाती फाटून गेली होती, तिथला तिच्या शरीराचा भाग काळ्या मुंगीच्या तोंडात होता. काळ्या मुंगीच्या छातीचा भाग फोडण्यासाठी फारच टणक असावा, लाल मुंगीच्या ताकदीबाहेरचा कदाचित. जखी योद्धा मुंगीच्या डोळ्यांमधील गडद बुबुळांमध्ये फक्त युद्धातच दिसते ती उन्मादाची भावना दिसत होती. त्या भांड्याखाली जवळपास अर्धा-एक तास त्या लढत होत्या. मी नंतर परत पाहिलं तेव्हा काळ्या योद्धा मुंगीने आपल्या शत्रूंची डोकी धडावेगळी केलेली होती आणि तरीही अंधुक जीव बाकी असलेली ती डोकी काळ्या मुंगीच्या दोन्ही बाजूंनी विजयाच्या भीषण ट्रॉफीप्रमाणे लटकत होती. अजूनही त्यांची पकड कायम होती. काळी मुंगीही त्या दोघांपासून पूर्ण सुटका करून घेण्यासाठी झगडत होती. तिचा एकच पाय उरला होता आणि इतर अनेक जखमी असतील ज्या मला दिसू शकत नव्हत्या. अजून अर्धा-एक तासाने तिला त्यात यश मिळालं. मी भांडं उचललं नि ती मुंगी त्या उद्ध्वस्थ अवस्थेत खिडकीतून बाहेर निघून गेली. ती शेवटी त्या लढाईतून वाचली की तिला एखाद्या इस्पितळात जाऊन पडावं लागलं याची मला कल्पना नाही, पण तिची क्रियाशीलता नंतर फारशी उरली नसावी असा माझा अंदाज आहे. त्या युद्धात कोण जिंकलं हेही मला कधीच कळू शकलं नाही. युद्धाचं कारणही मला कधीच कळू शकलं नाही. पण ते युद्ध, तिथलं क्रौर्य, जीवितहानी हे सगळं पाहिल्यानंतर जणू काही माझ्या दारासमोर मानवी युद्धच मी अनुभवलं असावं असं वाटून मी दिवसभर दडपलेल्या भावना वागवत होतो.
No comments:
Post a Comment